राज्यस्तरीय शिक्षिका साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

56

राज्यस्तरीय शिक्षिका साहित्य संमेलनाच्या

बोधचिन्हाचे अनावरण

मनिष सोनी

उमरगा : उमरगा (जि.उस्मानाबाद) येथे १५ व १६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय शिक्षिका साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण कवी बालाजी इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. गटशिक्षण कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी (ता. ३) कार्यक्रम घेण्यात आला . याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी देविदास बनसोडे, विस्तार अधिकारी शिवकुमार बिराजदार, श्रीमती मंदाकिनी मोरे, उदय जोशी ,अमर परळकर, काकासाहेब साळुंके, सुभाष चव्हाण, प्रवीण स्वामी, विजय ओवंडकर, शाशिकांत डांगे, जितेंद्र तोटलवाड, पत्रकार अविनाश काळे, शंकर बिराजदार आदी मार्गदर्शक सल्लागार उपस्थित होते. स्वागताध्यक्ष श्रीमती सरिता उपासे,
श्रीमती सारिका कोरे,
श्रीमती शितल जावळे, श्रीमती कल्पना गुंजोटे, श्रीमती बिना पोतदार, पद्मिनी कवठे , कल्पना कुलकर्णी, निर्मला यादव, वंदना सगर, पुष्पलता पांढरे, सुनिता पोतदार, आशा गुळवे , भाग्यश्री पाटील, सुनिता काजळे, प्रणिता बिरादार, मंगल कचले , शोभा रोडगे , आशा माने, अर्चना आबाचने , तनुजा गाढवे , कालिंदा डिगरे , भाग्यश्री यादव यांनी या भव्य अशा राज्यस्तरीय शिक्षिका साहित्य संमेलनासाठी सर्वानी पूर्णवेळ सहकार्य करावे असे आवाहन याप्रसंगी केलं आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शिला मुदगडे यांनी केले तर आभार श्रीमती संगीता डोकडे यांनी मानले.

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।