उपविभागीय पोलीस अधिकारी नवटके यांना निलंबित करण्याची रिपाईची मागणी

72

उपविभागीय पोलीस अधिकारी नवटके यांना निलंबित करण्याची रिपाईची मागणी

लोहारा /प्रतिनिधी

माजलंगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांनी एका प्रकरनात दलित समाजबादवांच्या विरोधात कलम 307 ची फिर्याद कशी लिहायची यासह अपशब्द वापरून अपमानास्पद वक्तव्य केल्याची व्हिडीओ क्लिप सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून या घटनेमुळे दलित बांधवांच्या भावना दुखावल्या जात आहेत त्यामुळे त्या वादग्रस्त उपविभागीय पोलीस अधिकारी नवटक्के यांना त्वरित निलंबित करून अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ )युवक आघाडी लोहारा तालुका यांच्या वतीने तहसीलदार राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे, या निवेदनावर रिपाइंचे उत्तम भालेराव, बालाजी माटे,दत्ता भाऊ गायकवाड, दयानंद खरोसे,किशोर माने, संजय गायकवाड,नेताजी कांबळे, हणमंत मस्के, शोभा मस्के, किशोर भालेराव, मंगलताई कांबळे,युवराज सूर्यवंशी,शुक्राचार्य थोरात,दगडू माटे,निशिकांत कांबळे,श्रीकात कांबळे, यांच्या सह रिपाइंच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्तेच्या सह्या आहेत,

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।