खामगाव येथिल हुंकार सभेत आकोटातुन जाणार शकडो रामभक्त

0
798
Google search engine
Google search engine

आकोट/ प्रतीनीधी

खामगाव येथिल दि,९ डीसेंबरला आयोजीत हुंकार सभेत आकोटातुन शकडो रामभक्त जाणार आहेत,याकरिता नुकतीच श्रीराम मंदिर मोठे बारगण ,आकोट येथे विश्व हिंदू परिषद व बंजरंग दल च्यावतीने विशेष बैठक घेण्यात आली .अयोध्या येथील जन्मस्थळी श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यास कमालीचा विलंब होत असून ७० वर्षापासून हा खटला प्रलंबीत आहे..त्यामुळे अनिश्चित काळपर्यंत या प्रकरणी निर्णय लांबणीवर पडत असल्याचे दिसुन येते आहे. यासाठी सर्व हिंदू समाज एकत्र करण्यासाठी खामगाव येथे हुंंकार सभेचे आयोजन दि. ९ डिसेंबर रोजी खामगाव येथील न.पा.शाळा क्र.६ चे मैदान टाँवर येथे होणाऱ्या सभेत हजारो कार्यकर्ते जमणार आहेत.

यावेळी हुंकार सभेच्या नियोजनासाठी पार पडलेल्या आकोटातील बैठकीसाठी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री प्रा.अजय निलदावार,विभाग संयोजक सूरज भगेवार,जिल्हा मंत्री प्रकाश घोगलिया ,हभप पांडे महाराज, नगराध्याक्ष हरिनारायण माकोडे, आकोला जिल्हा कार्यवाह अजय नवघरे, श्रीराम मंदिराचे अध्यक्ष श्री. मिसाळ उपस्थित होते. याप्रसंगी प्रा.निलदावार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला

व पुन्हा एकदा संघटीत होऊन या . व अयोध्येत श्रीराम जन्माभुमीवर भव्य मंदिर निर्माण करण्याच्या मागणी साठी दि.९ डिसेंबर ला खामगाव येथिल हुंकार सभेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.याप्रसंगी आकोट विश्व हिंदू परिषद व बजरंग दल संयोजक गोपाल कठाळे,पदाधिकारी व कार्यकर्ते गजानन माकोडे, नेमाडे ,बोडखे, रंघे,यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.असे कळवण्यात आले आहे.