उमरग्याच्या हरिप्रसाद चांडक यांनी दिला औरंगाबादच्या व्रद्धाश्रमाला आधार

444

उमरग्याच्या हरिप्रसाद चांडक यांनी दिला औरंगाबादच्या व्रद्धाश्रमाला आधार

१२५ पुरुष, महिला वृध्दास उबदार कान टोपी, हातमोजे, पायमोजे, तेल बाटली, बॉडी लोशन, नॅपकिन, महिलांना साड्यांचे वाटप

मनिष सोनी / उमरगा

उमरगा : सध्या सर्वत्र वाढती थंडी, गारठा व हुडहुडी अशा वातावरणात थंडीपासून संरक्षण व्हावे या उद्देशाने उमरगा येथील उमरगा व्यापारी महासंघाचे सचिव, रोटरी क्लब उमरगा चे माजी अध्यक्ष हरिप्रसाद चांडक यांनी मंगळवारी ( ता. २७) औरंगाबाद येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृध्दास उबदार वस्तूचे वाटप केले.
समाजात आपण संकष्टी चतुर्थी करतो, त्याचे उद्यापन देखील करतो. या उद्यापनास काही जोडपी, स्नेही, स्वजन, नातेवाईक यांना जेवणाचे आमंत्रण देऊन अन्नदान करतो. यापेक्षा एक आगळा वेगळा अन्नदानाचा उपक्रम करावा यासाठी श्री चांडक यांनी वृद्धाश्रमातील वृध्दास अन्नदान करण्याचे ठरवले व ते औरंगाबाद येथील जुगलकिशोर तापडिया यांच्या मातोश्री वृद्धाश्रमातील १२५ पुरुष, महिला वृध्दास उबदार कान टोपी, हातमोजे, पायमोजे, तेल बाटली, बॉडी लोशन, नॅपकिन, महिलांना साडी आदी उबदार वस्तूचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.
श्री चांडक यांना सामाजिक कार्याची आवड आहे. माहेश्वरी समाजाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावरून त्यांनी समाजास समाजसेवा करण्यास नेहमी प्रेरणा देत असतात. उमरगा येथील इंद्रधनू वृद्धाश्रम येथील वृध्दास, तुळजाभवानी अनाथ मुलांचे वसतिगृह ऐकूरगा वाडी येथील अनाथ मुलास ते नेहमीच अशा प्रकारची मदत व तसेच गोवर्धन गोशाळेच्या माध्यमातून गोसेवा करत असतात. त्यांचे कार्य हे समाजास प्रेरणादायी आहे.
औरंगाबाद येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृध्दास अशा भेटवस्तू दिल्या, त्यावेळी वृद्धच्या चेहऱ्यावर आनंद ओसरून आला. यावेळी सौ. उज्वला चांडक, डॉ. आतिष लड्डा, डॉ. हर्षलता लड्डा, डॉ. विशाल चांडक, डॉ. श्रद्धा चांडक, आरुषी लड्डा, अर्नवी लड्डा, वेदांश चांडक, स्वरा चांडक, आश्रमाचे व्यवस्थापक श्री पगारे, दिपक कुलकर्णी आदी उपस्थित होते.

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।