परंड्याच्या नगराध्यक्षावर गुन्हा दाखल करा अन्यथा खळखट्याक ; मनसेच्या जिल्हाध्यक्षा वैशाली गायकवाड व राजेंद्र गपाट यांचा इशारा

3243

परंड्याच्या नगराध्यक्षावर गुन्हा दाखल करा अन्यथा खळखट्याक ; मनसेच्या जिल्हाध्यक्षा वैशाली गायकवाड व राजेंद्र गपाट यांचा इशारा

उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुका परंडा येथील नगर परिषदेच्या नगर अध्यक्षाने पदाचा गैरवापर करून खोटा झोन दाखला तयार करून मुलाच्या नावे जमिन हडप केल्याप्रकणी मनसेच्या जिल्हाध्यक्षा वैशाली गायकवाड व जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट यांच्यासह मनसेच्या पदाधिकार्यांनी आज ६/१२/२०१८ ( गुरुवारी ) परंडा येथील मुख्य अधिकार्यांना निवेदनाद्वारे नगराध्यक्षावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात परंडा येथील सर्वे नंबर २३४( ब) मधील निलोफर एजाजखाँ पठाण यांच्या नावे असलेल्या जमिनीचा खोटा झोन दाखला तयार करून नगराध्यक्ष जाकिर इस्माईल सौदागर यांनी पदाचा गैरवापर करून या सर्वे नंबर मधील जागा त्यांचा मुलगा वसीम जाकिर सौदागर यांच्या नावावर केली आहे .सदर जागा यलो झोन मध्ये आहे परंतू नगराध्यक्ष यांनी हि जागा झोन दाखल्यावर मुख्याधिकारी यांची खोटी सही करून रजिस्टर करून हि जागा बळकावल्याचे नमुद केले आहे.तसेच पदाचा गैरवापर करणार्या नगाराध्यक्ष जाकिर सौदागर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल न केल्यास मनसे खळखट्याक स्टाईलने नगर परिषदेला टाळे ठोणार असल्याचा इशारा मनसेच्या महिला आघाडिच्या जिल्हाअध्यक्षा वैशाली गायकवाड व जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट यांनी दिला आहे निवेदनावर मनसेचे पदाधीकारी राजेंद्र गपाट,वैशाली गायकवाड , संतोष बारकुल ,सुदा झेंडे ,बिभीषण शिंदे ,किशोर गायकवाड, शाबेरभाई शेख ,सुरेश पाटिल ,मुर्तुजा सय्यद ,सुजित शिंदे,पांडुरंग सुतार आदिंच्या सह्या आहेत या इशार्यामुळे परंड्याचे नगराध्यक्षावर टांगती तलवार लटकल्याची चर्चा परंडा शहरात जोरात सुरू आहे दरम्यान परंडा येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी सही नमुना खरा की खोटा हे पडताळण्यासाठी दहा दिवसाचा कालावधी मागितला आसल्याचे पत्र वैशाली गायकवाड यांना दिले आहे .त्यामुळे नेमकी नगराध्यक्षावर काय कार्यवाही होणार याकडे लक्ष वेधले आहे.

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।