उस्मानाबादेत डिपीडिसी बैठकित पत्रकारांना प्रवेशबंदी

0
1115
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद –
उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक आज ता ७/१२/२०१८ रोजी उस्मानाबाद येथील मध्यवर्ती प्रशासकिय इमारतीमध्ये संपन्न होत आसताना बैठकितील अधीकार्याचे व पदाधीकारी यांचे साटेलोटे जनतेसमोर येऊ नये यासाठी सन २००१ मधील तत्कालीन मुख्यमंत्री कै विलासराव देशमुख यांच्या पत्राचा आधार घेऊन पारदर्शक प्रशासनाची वल्गना करणार्या पालक मंत्र्यांनी या बैठकिस पत्रकाराना प्रवेश नाकारला .विशेष म्हणजे गतवेळच्या बैठकिला पत्रकारांना प्रवेश देण्यात आला होता .त्यामुळे प्रशासनाच्या या कारभाराचा पत्रकारांसह सर्व सामान्य जनतेमधुन निषेध व्यक्त होत आहे.उपस्थीत पत्रकारांनी पालक मंत्र्यांनी बोलवलेल्या पत्रकार परिषदेस उस्मानाबादच्या सर्व पत्रकारांनी उपस्थीत न राहण्याचा निर्णय घेऊन तिव्र निषेध व्यक्त केला पालकमंत्री यांनी मागील बैठकीत प्रवेश दिला होता मात्र त्यानंतर त्याच्या विरोधात अधिकारी यांनी शासनाकडे रिपोर्ट केला , म्हणून पालकमंत्री हतबल झाल्याची चर्चा सुरु आहे . राज्य कुणाचे मंत्र्यांचे की अधिकारी यांचे ? राज्यकर्ते व अधिकारी यांचे हम साथ साथ है 2001 साल चे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पत्र घेऊन अधिकारी सज्ज झाल्याचे समजते