श्री क्षेत्र रिद्धपुर विकासकामांना शुभारंभ रिद्धपूर मराठी विद्यापीठासाठी शासन सकारात्मक – पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

0
836
Google search engine
Google search engine

अमरावती: महानुभाव पंथाची काशी व मराठी साहित्याची आद्यभूमी असलेल्या रिद्धपूरचे महात्म्य लक्षात घेऊन येथील विकास आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मंजूर केला. रिद्धपूर येथे मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे, यासाठी शासन सकारात्मक असल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे सांगितले.
श्री क्षेत्र रिद्धपूर विकास आराखड्यातील विकासकामांचे भुमिपूजन श्री. पोटे पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. रिद्धपूर येथे ११ कोटी ६४ लाख निधीतून राजमठ परिसरात संकुल, काँक्रिट रस्ते, स्वच्छतागृहे, मोकळ्या भूखंडांना कुंपण आदी कामे केली जाणार आहेत.

आमदार डॉ. अनिल बोंडे, श्रीमती वसुधाताई बोंडे, जि. प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे,

. भा. महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत गोपीराजबाबा शास्त्री, श्री गोविंदप्रभू सेवा समितीचे अध्यक्ष यक्षदेवबाबा, महंत वाईनदेशकरबाबा, श्री पाचराऊतबाबा, श्री तळेगावकर बाबा, मोहनराज दादा अमृते, राहूलराज शिवणेकर आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, या पावन भूमीत भूमिपूजन करता आले हे माझे भाग्य आहे. जिल्ह्यातील संत व महापुरुषांच्या भूमी व तीर्थक्षेत्र विकासासाठी मोठा निधी मिळाला. २२ हजार कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यात प्रचंड विकासकामे होत आहेत. त्यातून प्रत्येक गाव सुंदर करण्याचा ध्यास आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महाराष्ट्रात सर्वासाठी घरे, महाकर्जमाफी यासह आरोग्य, उद्योग, रस्तेनिर्मिती, रोजगारनिर्मितीला चालना देत आता ७२ हजार नोकरभरतीसारखे निर्णय घेतले आहेत. जातपातधर्म न मानता विकास होत आहे. रिद्धपुर येथील मराठी विद्यापीठाबाबत माझी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे, असे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.
रिद्धपूरमध्ये पाणीपुरवठा, बंदिस्त नाल्या, बाजार चौकाचे सौंदर्यीकरण अशा अनेक सुविधा होणार आहेत. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सर्व समाजाच्या हिताचा विचार करून अनेक निर्णय अंमलात आणले. मोर्शी, वरुड तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकरी सहाय्य, रोहयो कामे, विद्यार्थी सवलती अशा अनेक सुविधा लागू झाल्या आहेत, असे डॉ. बोंडे यांनी सांगितले.
रिद्धपुर येथे २८५ कोटी रुपयांचा प्रस्तावित आराखडा आहे. पहिल्या टप्प्यातील कामांना तत्वतः मंजुरी मिळाली आहे. ती सोमवारपासून सुरू होतील, असे श्री. माळवे म्हणाले.
श्री. वाईनदेशकर बाबांनी प्रास्ताविक केले.अजय पंडित, शकील बेग, श्री. करीम, श्री. नदीम यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

00000