प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे युवकांनीच केली नालीची साफसफाई – गुरूदेव कला उपासक सेवा मंडळ व साहस संस्थेचा पुढाकार

0
847

   चांदूर रेल्वे / शहेजाद खान 

चांदूर रेल्वे शहरातील गुरूदेव कला उपासक सेवा मंडळ व साहस संस्थेने पुढाकार घेऊन प्रशासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे युवकांनीच एसटी डेपोसमोरील नालीची रविवारी  साफसफाई केली. यामुळे संबंधित प्रशासनाला शरमेने मान खाली करावी लागणार आहे. 

     चांदूर रेल्वे शहरातील एसटी आगारासमोरील नालीमध्ये प्रचंड कचरा भरला होता. यामुळे नाली ब्लॉक झाली होती. सदर नाली साफसफाई करीता काही नागरिकांनी स्थानिक नगर परिषदेत माहितू दिली. परंतु सदर नाली बांधकाम विभागाच्या अधिन येत असल्याचे सांगितल्याचे युवकांनी सांगितले. यानंतर बांधकाम विभागाकडे काही नागरिक गेले असता त्यांनी नगर परिषदेचं काम असल्याचे सांगितले. त्यामुळे दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवित असल्यामुळे नालीची सफाई गेल्या अनेक महिण्यांपासुन झाली नसल्याचे युवकांनी सांगितले. प्रशासनाचे होत असलेल्या दुर्लक्षामुळे याचा त्रास एसटी डेपोतील प्रवाशांना, नागरिकांना होत होता. याचीच दखल घेऊन सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शहरातील गुरूदेव कला उपासक सेवा मंडळ व साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्थेच्या युवकांनी पुढाकार घेऊन सदर नालीची साफसफाई केली. त्या नालीतील संपुर्ण गाळ बाहेर काढून पाणी वाहण्यास मोकळी जागा निर्माण केली. त्यांच्या अशा सामाजिक कार्याबद्दल सगळीकडे प्रशंसा केली जात असुन यामुळे मात्र संबंधित प्रशासनाला शरमेने मान खाली करावी लागणार आहे. यापुर्वी याच युवकांनी ग्रामिण रूग्णालय, पोलीस स्टेशनची साफसफाई केली होती. यावेळी संग्राम क्षिरसागर (घुईखेड), चेतन भोले, भुषण शेळके, संजय शिंदे, मोहन हजारे, श्रीकांत मोदळे, आकाश वानखेडे, प्रफुल कोठेकर, लोकेश धामणकर, विजय काळसर्फे, शाम मेश्राम, रोचक चकुले, अनुज वाघ, अमोल राऊत, वैभव पाटने, सुरज भोयर, साहेबराव राऊत, ऋतिक शेळके,  रवीशेखर देशमुख, अनिल चौधरी, धनराज ब्राम्हणकर, अनिकेत क्षिरसागर, विलास झंझाळ, सागर क्षिरसागर, अमर सोनवाणे, मोना तांडेकर, बाबु सरोदे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले. तसेच शहरात प्रत्येक रविवारी आयोजीत श्रमदान मोहीममध्ये सहभागी होण्याचे आवाहन सुध्दा करण्यात आले.