कडेगाव तालुक्यातील गायरान जमिनीवरील बांधकाम अतिक्रमणे नियमानुकूल करावी : अँड. प्रमोद पाटील यांची मागणी

0
846

कडेगाव तालुक्यातील गायरान जमिनीवरील बांधकाम अतिक्रमणे नियमानुकूल करावी : अँड. प्रमोद पाटील यांची मागणी सांगली न्युज: सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील गायरान जमिनीवरील बांधकाम अतिक्रमणे लवकरात लवकर नियमानुकूल करून लोकाना मालकीचा पुरावा म्हणून सरकारी सनद मिळावी अश्या मागणीचे निवेदन दि. 6/12/2018 रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती कडेगाव तर्फे विस्तार अधिकारी श्री. सुनील लोहार साहेब व श्री. वाजे साहेब यांना अँड. प्रमोद पाटील, श्री. धोंडीराम महिंद यांनी दिले. सरकार च्या धोरणाप्रमाणे सरकारी व गायरान जमिनीवरील लोकांची असलेली बांधकाम अतिक्रमण नियमानुकूल करावी असे आदेश दिले आहेत. परंतु कडेगाव तालुक्यात गेले 2 महिन्यात त्याची शंभर टक्के अमलबजावणी झालेली नाही. तसेच शासनाने आतापर्यंत फक्त ज्या घरांच्या अतिक्रमण म्हणून ग्रामपंचायतीच्या रेकॉर्ड ला नोंदी आहेत त्यांचेचघर बांधकामे नियमित करणे बाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे कडेगाव तालुक्यातील 800 लोकांना याचा लाभ होणार आहे.*अँड. प्रमोद पाटील यांनी सांगितले की,*कडेगाव तालुक्यात गायरान जमिनीवर अतिक्रमण करून केलेली एकूण बांधकाम जवळपास 1500 आहेत. त्यापैकी 800 घरांच्या ग्रामपंचायत रेकॉर्ड ला अतिक्रमण म्हणून नोंदी असून त्या लोकांचे नावचे गाव नमुना नंबर 8 अ चे उतारे निघतात. परंतु 700 लोकांची घरांचे नोंदीच ग्रामपंचायत रेकॉर्ड ला नाहीत. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांचे बाबत अजून शासनाने काहीही निर्णय घेतला नाही. त्यामुळे ज्यांचे घरांचे नोंदी नाहीत त्यांनी लवकरात लवकर ग्रामपंचायत कडे तक्रार नोंदविणे कायद्याने आवश्यक आहे. ज्यांचे तक्रारी प्राप्त होतील त्या लोकांचे बाबतीत केसेस चालवून निर्णय दिला जाणार आहे. त्यामुळे ज्या घरांचे नोंदी नाहीत त्या लोकानी आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा असे आवाहन अँड. प्रमोद पाटील यांनी केलेले आहे. अन्यथा जे लोक वेळेत जागे होणार नाहीत त्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे.कडेगाव तालुक्यात अजून सरकारी अधिकारी यांनी एका व्यक्तीकडून सुद्धा अतिक्रमण नियमानुकूल करणेसाठी लागणारी दंडाची रक्कम भरून घेतलेली नाही तसेच एक पण बांधकाम अतिक्रमण नियमानुकूल झालेले नाही. तसेच एका व्यक्तीला सुद्धा मालकीचा पुरावा म्हणून ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांचे सहीने सरकारी सनद मिळालेली नाही.कडेगाव तालुक्यात सरकारी व गायरान जमिनीवर अतिक्रमण करून राहिलेल्या लोकांपैकी बहुतांश लोक हे गरीब, अडाणी व अशिक्षित आहेत त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली आहेअजून थोडे दिवसात सरकारी अधिकारी कडेगाव तालुक्यातील सर्व अतिक्रमित बांधकामे नियमित करतात का व मालकीचा पुरावा म्हणून सरकारी सनद देतात का ते पाहणार आहे अन्यथा त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे असे अँड. प्रमोद पाटील यांनी सांगितले.