घुईखेड स्टेट बँकेच्या कॅशीयरची ‘हिटलरशाही’ वृध्द महिलेचे बँकेचे पासबुक फाडुन फेकले अंगावर @TheOfficialSBI @RBI #SBI

0
1555
Google search engine
Google search engine

पोलीसात लेखी तक्रार दाखल 

कॅशीअरवर निलंबनाच्या कारवाईची मागणी

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 


चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील एका वृध्द महिलेने पासबुक देऊन ऐंट्री करून देण्याची करण्याची मागणी केली असता चक्क कॅशीयरने सदर वृध्देचे पासबुक फाडून अंगावर फेकल्याची घटना सोमवारी घडली. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी कॅशीअर मिरगेंवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली असुन अन्यथा ताला ठोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. यानंतर वृध्देने मंगळवारी तळेगाव पोलीस स्टेशनला याबाबत लेखी तक्रार दिली आहे. 

प्राप्तमाहितीनुसार वृध्द महिला रमाबाई वरघट यांचे घुईखेड स्टेट बँकेमध्ये बचत खाते आहे. या खात्यामध्ये त्यांना एका योजनेचे पैसे येत असल्यामुळे त्या पैसे आले की नाही याची खात्री करण्याकरिता सोमवारी घुईखेड स्टेट बँकेत गेल्या होत्या. परंतु कॅशीयर मिरगे यांनी  पासबुक प्रिंट न करून देता थेट महिलेच्या अंगावर फाडून फेकून अपमानजनक वागणुक दिल्याचा आरोप केला आहे. यापुर्वी सुध्दा याच कॅशीअरच्या अनेक तक्रारी झाल्या. परंतु त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. सदर कॅशीअर विनाकारण बँकेच्या ग्राहकांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कॅशीयरचा मनमानी कारभार सुरू असतांना वृध्देचे पासबुक फाडून फेकल्याने कॅशीयरची ‘हिटलरशाही’ पुढे आली आहे. या घटनेनंतर बँकेच्या वरिष्ठांनी मंगळवारी घुईखेड स्टेट बँकेत भेट दिल्याचे समजते. त्यामुळे आता या कॅशायरवर वरिष्ठ कारवाई करणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरेल. यानंतर सदर महिलेने तळेगाव पोलीस स्टेशन गाठून लेखी तक्रार दिली. यानंतर पोलीसांनी तक्रारीची नोंद करून कलम ४२७, ५०४ कलमान्वये प्रकरण चौकशीत ठेवले आहे.


निलंबन करा, अन्यथा बँकेला ताला ठोकणार – वरघट


श्री वरघट

घुईखेड येथील वृध्द महिलेचे स्टेट बँकेच्या कॅशीयर मिरगे यांनी पासबुक फाडुन अंगावर फेकले व अपमानास्पद वागणुक दिली. याबाबत आम्ही तक्रार केली असुन येत्या आठ दिवसाच्या आत कॅशीयरचे निलंबन करून कारवाई करा अन्यथा बँकेला ताला ठोकुन आंदोलन करण्याचा इशारा घुईखेड येथील अनिल वरघट यांनी दिला.

तक्रार प्राप्त, चौकशी सुरू – एएसआय राठोड

वृध्द महिलेची लेखी तक्रार प्राप्त झाली असुन प्रथम तक्रारीची शहानिशा करून चौकशी करणार आहो. चौकशीत काही आढळल्यास पुढील कारवाई करणार असल्याचे तळेगाव दशासर पोलीस स्टेशनचे एएसआय वसंत राठोड यांनी सांगितले.