येणाऱ्या काळात केंद्र आणि महाराष्ट्रातही सत्ता परिवर्तन अटळ – धनंजय मुंडे

0
1046

 हा तर सुज्ञ जनतेचा विजय अन् सर्वसामान्यांना गृहीत धरणाऱ्या गर्विष्ठ भाजपचा पराभव

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –  “येणाऱ्या निवडणुकांत महाराष्ट्रातही सत्ता परिवर्तन अटळ आहे. हा सुज्ञ जनतेचा विजय अन् सर्वसामान्यांना गृहीत धरणाऱ्या गर्विष्ठ भाजपचा पराभव आहे.” अशी प्रतिक्रिया विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लागलेल्या पाच राज्यांच्या निकालानंतर दिली आहे.

“मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या चितेवर श्रीमंतांसाठी विकासाचे महाल बांधू पाहणाऱ्या भाजपचा मनोरा कोसळला आहे. केंद्र आणि महाराष्ट्रातही आगामी काळात सत्ता परिवर्तन अटळ आहे.” असा विश्वसा मुंडेंनी व्यक्त करत राहुल गांधी आणि संपूर्ण काँग्रेस आघाडीचे अभिनंदन केले आहे. दरम्यान भाजपला अजूनही संधी आहे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या तीन राज्यात काँग्रेसचं नाव बदलून भाजप ठेऊन त्यांच्या भक्तांच सांत्वन करू शकतात असे म्हणत मुंडेंनी भाजपच्या नामांतर मोहिमेवरून त्यांना चिमटा काढला. या पराभवातून धडा घेत कमीत कमी उर्वरित काळात तरी भाजप, खास करून महाराष्ट्रातील भाजप निवडणूक मोड मधून बाहेर येत सामान्यांसाठी काम करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेतकरी, कामगार, युवा वर्ग, विविध समाज घटकांना भाजपने अनेक स्वप्न दाखवत सत्ता काबीज केली होती. पण, सत्य शाश्वत असते. जनता एकदा फसू शकते वारंवार नाही. भाजपचा बेगडी चेहरा छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील जनतेने वेळीच ओळखला आहे. त्यामुळे आगामी काळात वंचित घटकांना सोबत घेऊन केंद्रात आणि महाराष्ट्रातही सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.