चांदूर रेल्वे ग्रामिण रूग्णालयातील रिक्त पदे तत्काळ भरा प्रहार जनशक्ती पक्षाचे एसडीओंना निवेदन

0
729
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
चांदूर रेल्वे ग्रामिण रूग्णालयातील रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे स्थानिक उपविभागीय अधिकारी अभिजीत नाईक यांना निवेदन देऊन केली आहे. 
चांदूर रेल्वे ग्रामिण रूग्णालयातील परिचारीकाचे ३ पदे अनेक दिवसांपासुन रिक्त आहे. या रिक्त पदामुळे रूग्णालयामध्ये रूग्णांची प्रचंड गैरसोय होतांना दिसत आहे. परिचारिका नसल्यामुळे रूग्णालयातील गार्ड रूग्णांना ड्रेसिंग व टाके मारण्याचे काम करीत आहे. त्यामुळे रूग्णांची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसुन रूग्णांची संख्या सुध्दा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख अंकुश खाडे, माजी तालुका प्रमुख सौरभ इंगळे, उपतालुका प्रमुख अनुप दुबे, अनुप शेळके, मयूर देशमुख, रोमेश्वर कैकाळे, रवींद्र केने, सोनू शेख, भूषण शेळके, विशाल शेळके, एकनाथ कुमरे, कपिल सोनटक्के आदींनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.