कळंबमध्ये  दोनशे रुपयाची लाच स्विकारताना अभिलेखापालासह शिपाई  गजाआड

0
2814
Google search engine
Google search engine

कळंबमध्ये दोनशे रुपयाची लाच स्विकारताना अभिलेखापालासह शिपाई गजाआड

उस्मानाबाद – कळंब उप अधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयातील अभिलेखापाल याने तक्रादाराकडून सीटी सर्हेचे टिपण व टोच नकाशा देण्यासाठी शिपायामार्फत केवळ दोनशे रुपयाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने कार्यवाही करून रंगेहात पकले आहे. याबाबत अधीक माहिती आशी कि कळंब येथील एका फ्लाँट चे सीटी सर्वे टिपण व टोच नकाशा देण्यसाठी कळंब उप अधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयातील अभिलेखापाल नेमीनाथ रंगनाथ कवडे यांने शिपाई पंढरी विठ्ठल वाघमारे याच्या मार्फत दोनशे रुपयाच्या लाचेची मागणी केली याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार प्राप्त होता पोलिस अधीक्षक श्रिकांत परोपकारी व उप आधिक्षक बी व्हि गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनय बहिर यांनी तक्रारीची शहानीशा करून बुधवार ता १२/१२/२०१८ रोजी उप अधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयात सापळा लावला .यावेळी उपरोक्त कामासाठी अभिलेखापाल नेमीनाथ कवडे यांच्यासाठी शिपाई पंढरी वाघमारे यास दोनशे रुपयाची लाच कार्यालयाबाहेरील दरावाज्यासमोर लाच स्विकारताना रंगेहात पकडले .या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनीयम २०१८ नुसार पुढिल कायदेशीर कार्यवाही करण्यात आली असून तपास पोलिस निरीक्षक विनय बहिर हे करत आहेत