मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यातून जरूड-पिंपळखुटा-वावरोळी रस्त्याची दर्जोन्नती होणार- विकासाकामाचे आ.डॉ.अनिल बोंडे यांच्या हस्ते भूमिपूजन

0
788
Google search engine
Google search engine

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सन २०१७-१८ या वित्तीय वरुड तालुक्यातील राज्य मार्ग क्रं.४७ जरूड-पिंपळखुटा-वावरोळी रस्त्याची दर्जोन्नती करण्यासाठी राज्य शासनाने विकास कामांच्या अंदाजित रक्कम ३ कोटी ४४ लक्ष ४९ हजार रुपयाला प्रशासकीय मान्यता दिली. या विकासनिधीमध्ये राज्य शासनाने आमदार डॉ.अनिल बोंडे यांच्या मागणीला ग्राह्य धरून वरुड-मोर्शी विधानसभा मतदार संघातील जरूड-पिंपळखुटा-वावरोळी रस्त्याच्या सुधारणेकरिता ३ कोटी ४४ हजार रुपयाचा निधी प्राप्त करून दिल्याबद्दल गावक-यांनी आमदारांसह भाजप सरकारचे आभार व्यक्त केले. यावेळी या विकास कामाचे भूमिपूजन सोहळा मोर्शी-वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांच्या शुभहस्ते शनिवार दिनांक १५ डिसेंबर २०१८ रोजी जरूड येथे ५ वा भूमिपूजन तर पिंपळखुटा येथे ५ वा सभा घेण्यात आलेली आहे.

कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी राहतील तर प्रमुख अतिथी म्हणून मातोश्री त्रिवेणी बोंडे महिला सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षा डॉ.सौ.वसुधाताई बोंडे, प्रमुख उपस्थिती भारतीय जनता महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा व पंचायत समिती सदस्या सौ.अर्चनाताई तुमराम, भारतीय जनता युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मनोजदादा माहुलकर, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ ज्योतीताइ कुकडे,गोपाल्भाऊ मालपे, नितीन देशमुख,हनुमंतराव पाटील,नरेंद्र रानोटकर,सुधीरमामा धर्मे,डॉ.नितीन वानखडे,भिमरावजी वाळोदे,अवधूतराव वानखडे,देविदास मरसकोल्हे,श्रीकृष्ण रानोटकर,प्रकाशराव गाठे,देविदास मरसकोल्हे,गजानन पडोळे, ज्योती पडोळे,सुशीला अघम,मयुरी पंधराज,रत्नप्रभा राउत,सचिन सव्वालाखे,विष्णूराउत यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रम पार पडणार आहे. या विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याला व जाहीर सभेला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे रवी वसुले,अनिल भुते,केशवराव गुर्जर,रिंकेश राजस,जितेंद्र चरपे,सुरेश भुते,हर्षल नीचत,रोशन खुटपडे,योगेश चढोकार,योगेश सोळंके,प्रभाकरराव कुऱ्हाडे,वासुदेवराव टोगसे,हरीश पोकळे,अजय राठोड,सतीश कुमरे,ज्ञानेश्वर भोंगाडे,मनोज श्रीराव,रमेश हरले,रमेश चरपे,दिनेश नीचत यांनी आवाहन भारतीय जनता पार्टी वरुड ग्रामीणच्या वतीने करण्यात आलेली आहे. मतदार संघाच्या विकासासाठी नेहमीच तप्तर असलेले भाजपचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून आतापर्यंत करोडो रुपयांचा विकास निधी खेचून आणला आहे. मोर्शी – वरुड तालुका सुख – समृद्ध व्हावा या दृष्टीकोनातून त्यांनी डांबरीकरण व क्राक्रीट रस्ते, नाली बांधकाम, गाव-गावात सांस्कृतिक सभागृह, गाव तिथे युवक – युवतींसाठी वाचनालय व व्यायाम शाळा, शेतकरी बांधवांसाठी जीवनदायी असलेले पांधन रस्ते मोकळे करून त्याला मातीकरण, खडीकरण तसेच डांबरीकरण करणे, जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून कोल्हापुरे, सिमेंट बंधारे व नदीचे खोलीकरण करून घेतले असून आज हि या कामाचा झंझावात आ.डॉ.अनिल बोंडे यांनी कायमचा सुरु ठेवला आहे. या विकास कामाचे भूमिपूजन सोहळा मोर्शी-वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याला व जाहीर सभेला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी वरुड ग्रामीणच्या वतीने करण्यात आलेली आहे.