सुरळीत वाहतुक व्यवस्थेसाठी ठाणेदार गजानन शेळकेंची बाळापुरवासियांना साद

0
1450
Google search engine
Google search engine

आकोला/प्रतिनीधी

बाळापूर शहरातील वाहतुक सुरळीत तथा सुरक्षित पणे व्हावी याकरीता बाळापुरचे नविन ठाणेदार गजानन शेळके यांनी शहरातील वाहन धारकांसह ,वाहनचालकांशी संवाद साधला.बाळापुर पो.स्टे.च्या या बैठकीत ठाणेदार शेळके यांनी ऑटो,तसेच कालिपिवळी प्रवासी वाहतूक करीत असलेल्या वाहन चालकांची मिटींग घेण्यात आली.यावेळी ठाणेदार गजानन शेळके यांनी सर्वाना वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्या साठी मार्गदर्शन केले. तथा सर्वाना कायदा व सुव्यवस्था चांगली राहण्यासाठी सूचना दिली. तसेच नियम बाह्य प्रवाशी वाहतूक कोणीही करू नये केल्यास त्याचेवर कार्यवाही करण्यात येईल असे सर्वाना सूचित केले.

शहरातील वाहतुक व्यवस्थेसाठी आयोजित या सभेला शहरवासीयांची भरगच्च उपस्थिती होती.ठाणेदार शेळके हे संवेदनशिल मनाचे सकारात्मक पोलिसिंग करणारे अधिकारी म्हणुन अकोला जिल्ह्यातील जनतेला परीचित आहे.आकोट शहर पो.स्टे ला असतांना जनतेनी त्यांच्या लोकाभिमुख पोलीसिंगचे कौतुक केले होते.