उस्मानाबादच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील केस पेपर गहाळ ; ४८ तास रुग्णाची हेळसांड

0
1339
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद – कोंड येथील मीनाक्षी युवराज जाधव कुटूंब नियोजनाचे आँफरेशन व काँपर्टि काढण्यासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले होते १२/१२/२०१८ रोजी दुपारी अँडमिट करण्यात आले होते.दरम्यान मिनाक्षी जाधव यांच्यावर कसलाही उपचार करण्यात आला नव्हता . डाँक्टर रुग्णांजवळ येऊन विचारपूस करून निघून गेले त्यावेळीही डाँक्टर नी केसपेपर विचारला नाही . दरम्यान रुग्णाचे पती युवराज जाधव यांनी करर्मचार्यांना रुग्णाबाबत विचारपूस केली असता पेपर गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. युवराज जाधव यांनी आम्हाला सांगीतलेली माहीती अशी कि रुग्ण दवाख्यात दाखल केल्यापासून आजपर्यंत रुग्णावर कसलाही उपचार केलेला नाही . ४८ तास लोटले तरीही कोणीही फिरकली नाही. युवराज जाधव यांचा रागाचा पारा चढलेला पाहून रुग्णालयातील कर्मचार्यांची केसपेपरची फाईल शोधण्यासाठी धावपळ सूरू झाली . नंतर १४/१२/२०१८ रोजी सकाळी केसपेपरवर नर्सने लिहून रक्त तपासा असे जाधव यांना सांगीतले .त्यामुळे स्त्री रुग्णालयात रुग्णाच्या फाईल जर गहाळ होत असतील तर उपचार कसा होईल ? असा सवाल उपस्थीत होत आहे .या झालेल्या प्रकारावर अधीकारी काय कार्यवाही करणार याकडे लक्ष लागले आहे.या रुग्णालयातील सुरु असलेल्या या भोंगळ कारभाराकडे नेते पूढार्यांचे थोडही लक्ष नाही अशी प्रतिक्रीया राहूल जाधव यांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केली .