डाँ बाबासाहेबांच्या स्मारकासाठी तडवळा ते उस्मानाबाद पद यात्रा

0
659
Google search engine
Google search engine

कसबे तडवळे : कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरू करावे यासाठी शुक्रवार (ता.14) रोजी सकाळी दहा वाजता कसबे तडवळे ते जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद पद रॅली काढून निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 22 व 23 फेब्रुवारी 1941 रोजी कसबे तडवळे येथे येऊन भारतातील पहिली महार-मांग वतनदार परिषद घेतली. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या शाळेत दोन दिवस मुक्काम केला होता. त्या जागेवर शासनाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधण्याचे घोषीत करून त्यासाठी लागणारा निधी सामाजिक न्याय विभागाकडून 85 लाख 31 हजार 223 रूपये एवढी रक्कम सन 2016 मध्ये मंजूर केली आहे. त्या रक्कमेचा वापर स्मारकासाठी लवकरात लवकर करावा या निवेदनातून मागणी केली आहे.
यावर निवेदनावर अनेक ग्रामस्थांच्या सह्या होत्या.
….