परंडेकरांना मनसेच्या अल्टिमेटची उत्सूकता ; आठ दिवस गेले दोन दिवस उरले

0
1150
Google search engine
Google search engine

परंडेकरांना मनसेच्या अल्टिमेटची उत्सूकता ; आठ दिवस गेले दोन दिवस उरले

उस्मानाबाद – परंडा नगर परिषदेचे नगराध्यक्ष यांनी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत मनसेच्या पदाधीकार्यांनी ता ६/१२/२०१८ रोजी नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना नगराध्यक्षावर कार्यवाही करण्यासाठी निवेदन दिले आहे . परंड्याचे नगर परिषदेचे नगराध्यक्ष सौदागर यांनी पदाचा पदाचा गैरवापर करून नगर परिषदेच्या हद्दीतील यलो झोन मधील सर्वे २३४( ब) मधिल जागा खोटा झोन दाखाला तयार करून मुलाच्या नावे रजिस्टर केल्याचा मोठा घपळा मनसेच्या हाती लागला आहे .त्यामुळे सौदागर यांच्यावर गुन्हा दाखल खरा आन्यथा खळखट्याक फेम वैशाली गायकवाड व जिल्हाअध्यक्ष राजेंद्र गपाट यांच्यासह मनसेच्या पदाधीकारी व कार्यकरत्यानी मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करून नगर परिषदेला टाळे ठोकणार असल्याचा इशारा दिला होता .परंतू नगर परिषदेच्या मुख्याधीकारी यांनी दहा दिवसाचा अल्टिमेट लेखी दिला होता . आता आठ दिवस लोटले फक्त दोन दिवस उरले आहेत आद्यापही नगर परिषदेने झोन दाखला खरा कि खोटा या बाबत कळवले नसल्याचे राजेंद्र गपाट यांनी सांगीतले आहे.त्यामुळे खळखट्याक आंदोलनाचा परंडेकरांना नाद लागला आहे .परंडेकर दररोज कँलेंडरवर खूना करून तारखा मोजत आहेत .नुकतेच लातूर जिल्ह्यातील औसा नगर परिषदेच्या नगर आध्यक्ष पद रद्द झाल्यामुळे राष्ट्रवादीला घरघर लागणार कि काय आशी ही परंड्यात उलट सुलट चर्चा रंगली आहे. आता मनसे खळखट्याक आंदोलन कसे करणार ? याकडे लक्ष वेधले आहे