आता शेतकऱ्यांच्या व कडेगांव परीसरातील जनतेच्या नजरा जिल्हाधिकारी विजयकुमार काळमपाटील यांचेकडे

0
1262
Google search engine
Google search engine

सांगली न्युज:सांगली जिल्ह्यातील कडेगांव येथील कडेगांव तलाव टेंभु उपसा जलसिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश करावा,आवर्तने वेळेत सोडली जावीत,शेतकऱ्यांकडुन वसुल केलेल्या पाणीपट्टी च्या पावत्या पाटबंधारे विभागाकडुन मिळाव्यात इत्यादी विविध मागण्यासाठी कडेगांव येथील सामाजिक कार्यकर्ते डी एस देशमुख, राजाराम संपत माळी,वैभव देसाई यांनी कडेगांव तहसिल कार्यालयासमोर कालपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.त्या उपोषणाच्या आजच्या दुसऱ्यादिवशीही कोणत्याही अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाही.आता नजरा फक्त जिल्हाधिकारी विजयकुमार काळमपाटील यांचेकडे तमाम जनतेच्या,शेतकऱ्यांच्या व उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांच्या लागल्या आहेत.तेच न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा शेतकरी वर्गातुन व जनतेतुन व्यक्त होत असताना दिसत आहे.कडेगांव तलावात कायमस्वरूपी पाणी सोडण्याची ग्रामस्थ,शेतकरी यांनी वारंवार मागणी करूनही पाणी सोडले जात नाही.हा तलाव टेंभु लाभक्षेत्रात येत नाही असे कारण टेंभुचे अधिकारी पुढे करतात.परंतु या पाण्याची पाणीपट्टी मात्र शेतकऱ्यांकडुन हे टेंभुचे अधिकारी वसुल करतात .म्हणजेच पाणी उशाला कोरड घशाला असा टाहोच कडेगांव परीसरातील जनतेला व शेतकऱ्यांना फोडावा लागत आहे.आंदोलन,रस्ता रोको करावा लागतो आहे.कोणत्याही प्रकारची मागणी हे टेंभुचे अधिकारी मान्य करीत नाहीत.पाणी आमच्या हक्काचे आहे.ते मीळालेच पाहीजे असे तमाम जनतेचा व शेतकऱ्यांचा टाहो प्रशासनाला व टेंभु योजनेच्या अधिकाऱ्यांना कदाचित ऐकु जात नसेल.हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन,मोर्चे,रस्ता रोको वारंवार का करावे लागतात हाच खरा प्रश्न तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना व कडेगांव परीसरातील जनतेला पडला आहे.कडेगाव तलावाचा टेंभु योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश केला तर या परीसरातील पाणी प्रश्न कायमचा मिटेल.जिल्हाधिकारी यांनीच या आमच्या हक्काच्या पाण्यासाठी लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू करावेत अशी नागरीकांची आशा आहे.कडेगाव तलावाचा टेंभु योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश करावा, कडेगांव कालव्याची हद्द निश्चित करून बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी द्यावे कडेगांव परिसरातील नेर्ली,अपशिंगे,कोतवडे,खंबाळे तडसर, हिंगणगाव आदि वंचीत गावांना पाणी द्यावे अशा मागण्या आहेत.आता खऱ्या अर्थाने कडेगांव परिसरातील जनतेला,शेतकऱ्यांना व कालपासुन कडाक्याच्या थंडीत कुडकुडत बसलेल्या आमरण उपोषणाला बसलेल्या डी एस देशमुख,वैभव देसाई व राजाराम माळी ,विलास जरग यांना एकच आशेचा किरण दिसत आहे तो म्हणजे आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विजयकुमार काळमपाटीलच कडेगावच्या ज्वलंत पाणी प्रश्नावर निर्यात मिळवुन देतील.व कडेगाव तालुक्याचा पाणी प्रश्न कायमचा मिटेल अश्या आशा उपोषणकर्ते,शेतकरी व जनतेत पल्लवीत झाल्या आहेत.