संज्योती जगदाळे हिचे इंद्रधनुष्य युवा महोत्सवात घवघवीत यश

0
1350
Google search engine
Google search engine

.सांगली न्युज:नाशिक येथे आयोजीत राज्यस्तरीय इंद्रधनुष्य युवा महोत्सवमध्ये मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालयाची विद्यार्थ्यांनी कु.संज्योती जगदाळे हिने सहा कला प्रकारात उत्कृष्ट यश संपादन केले.पाश्चिमात्य समुहगीत व्दितीय, एकांकिका व्दितीय,लोकवादयवृंद व्दितीय, नकला व्दितीय, भारतीय समुहगीत तृतीय,पाश्चिमात्य एकल गझल व्दितीय,ई.गायन प्रकारात धवधवीत यश मिळवले.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या संघाला स्पधैत उपविजेते पद मिळवून सज्योती हिने मोलाची कामगिरी केली आहे.वरील सहा प्रकारात तीची निवड पुणे येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय युवा महोत्सवात स्पधैसाठी झाली आहे.तीच्या या यशाबाबत शालेय व्यवस्थापण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम,भारती विद्यापीठ कार्यवाह डाँ.विश्वजीत कदम, प्र.कुलपती डॉ. शिवाजीराव कदम,विभागीय संचालक डॉ. एच.एम.कदम यांनी अभिनंदन केले.महाविद्यालयाच्या प्राचार्या डाँ.सुलक्षणा कुलकर्णी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.विष्णू कदम,कमिटीचे सदस्य प्रा.डाँ.सौ.मंदा घाडगे,प्रा.सौ.शिला मोहिते,प्रा.सौ.मंदा घाडगे,प्रा.सौ.उल्का पाटील, प्रा.सौ.डी.एस.पाडळकर,प्रा.कृष्णा भवारी,प्रा.महेश माळी यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले.