भक्तीधाम येथे संत गुलाबराव महाराज साहित्य संमेलनाचे उदघाटन भक्तिमय वातावरण साजरे विशेष उपस्थिती म्हणून नागपूर म.न.पा आयुक्त अभिजित बागर याची उपस्थिती. बादल डकरे चांदुर बाजार

0
841
Google search engine
Google search engine
चांदुर बाजार :-


आपल्या संस्कृतीवर अनेकदा वैचारिक, आध्यात्मिक, आणि संस्कृतिक आक्रमणे झालीत. आपले विचार, परंपरा लयास जाईल की काय अशी भिती निर्माण झाली होती. परंतु, त्या त्या काळात अतिशय कठीण प्रसंगी, देशभरातील संत साहित्य व त्यांच्या विचारांनी समाज व्यवस्था पुन्हा पुन्हा उभारणीस आणली. म्हणूनच समग्र संत साहित्य हे कठीण प्रसंगी समाजाला उभारी देणारे आहेत. गुलाबराव महाराजांनी आपल्या साहित्या मधून समन्वयाचा सुंदर विचार मांडला आहे. आज जग भौतिकतेकडे धावत आहे. परिणामी आज समाज व्यवस्था विस्कळीत होत आहे. अशावेळी संपूर्ण जगाला महाराजांचा, समन्वय विचारच तारणहार ठरणारा असेल. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने , गुलाबराव महाराजांच्या समग्र साहित्य संपदेवर चिंतन व्हावे. मननहावे. साहित्य संमेलनाच्या विचार मंथणातून निघणारा सार,सर्वांनी र्शध्देने व निष्ठेने प्रसाद म्हणून ग्रहण करावा. तसेच गुलाबराव महाराजांच्या विचारांचा वारकरी समजून, सर्वांनी त्याचे साहित्याचा प्रचार आणि प्रसार सर्वदूर न्यावा. असे विचार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी मांडले. 
यावेळी ते संत गुलाबराव महाराज साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणूनते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. अरविंद देशमुख, स्वागताध्यक्ष आ. बच्चूभाऊ कडू, मनपा नागपूर चेआयुक्त अभिजित बांगर,माजी कुलसचिव वंदन मोहोड, माजी जि. प.अध्यक्ष सुरेखा ठाकरे, राजा देशमुख तळवेलकर, भारतिय विचार मंचाचे शुभाष लोहे, भक्तिधामचे वसंत हळवे, मनोहर किरकटे, पंडित मोहोड,अँड. आर. बी. अटल,वैभव जोशी, साहेबराव मोहोड, श्रीरंग घटाटे आदी मान्यवर उपस्थित होते. 
अरविंद देशमुख म्हणाले की, येणार्‍या काळात संत श्री गुलाबराव महाराजांचे साहित्य हे विश्‍वालावंदनीय ठरणारे असेल. देव,देश,धर्म याची विज्ञान्याच्या कसोटीवर खरी उतरणारी आध्यात्मिक मांडणी,तर्कशुद्ध व शास्त्रार्धा व्दारे पटवून दिली आहे. ती आजच्या विज्ञान युगात खोडून काढणे अशक्य आहे. महाराजांच्या साहित्य संपदेचे मुळ हे गीता आहे. त्यामुळे महाराजांची साहित्य संपदाही, आंतरीक, वैचारीक, आध्यात्मिक, मानसिक, आणि जागतिक शांतता प्राप्त करण्यासाठी आहे. त्यासाठी महिराजांचे साहित्याचा प्रसार व प्रचार होणे आवश्यक आहे. म्हणूनच या साहीत्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उद्घघाटन सोहळ्यात मान्यवरांचे शाल,श्रीफळ व संन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सकाळी ग्रंथदिंडी च्या ग्रामप्रदक्षिणेने नंतर११ ला साहित्य संमेलन च्या, उद्घघाटनाचा सोहळा वेदमंत्र च्या घोषात सुरवात करण्यात आली. 
प्रास्ताविक आ. कडू यांनी केले. तर उद््घाटन सोहळ्याचे र्शवणीय असे संचालन, व आभार प्रदर्शन प्राचार्या डॉ. नयना कडू यांनी केले. याच कार्यक्रमात डॉ. पाटील यांच्या समन्वयक या गुलाबराव महाराजांवरील पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरिल ईतर मान्यवरांनी, महाराजांच्यासाहित्य संपदेवर आपले विचार मांडले. या साहित्य सोहळ्याला वारकरी मंडळींची उपस्थिती लक्षणीय होती.