अकोट मध्ये WAR (वॉर) फाऊंडेशनच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

0
2963
Google search engine
Google search engine

आकोट/ संतोष विणके

शहरातील WAR (वॉर) फाऊंडेशनच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे दिनांक 6 जानेवारी 2019 ला सकाळी 6 वा. आयोजन केले असल्याची माहिती WAR फाऊंडेशनच्या भैरवी हिंगणकर, प्रिती मासोदकर यांच्यासह संघटनेच्या उपस्थित सर्व महिला सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिली.आरोग्याबद्दल प्रत्येकाने जागरूक असावे हा उद्देश ठेवून या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले.WAR (वॉकींग & रनिंग फोर फ्युचर फॉर हेल्थ) ही संघटना गेल्या दोन वर्षांपासून शहरात विविध वयोगटातील स्पर्धकांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करते आहे विशेष म्हणजे

े WAR या संघटनेतील सर्व सदस्य या महिला व गृहिणी आहेत.आयोजकांच्या वतीने आकोट शहर तथा ग्रामीण भागातील सर्व शाळा महाविद्यालय सामाजिक संस्था शिकवणी वर्ग विविध खेळाडूंनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन विविध बक्षिसे जिंकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे आयरन मॅन म्हणून ओळखले मिळवणारे 7 तास 21 मिनिटात 21.1 किलोमीटर धावणे,90 किलोमीटर सायकलिंग 1.9 किलोमीटर समुद्रसफारी पोहुन ओळख मिळवणारे अकोल्याचे बालरोग तज्ञ डॉ.पराग टापरे यांच्यासोबतच प्रत्येक खंडातील मॅरेथॉनमध्ये धावणारे डॉक्टर प्रशांत मुळावकर तसेच अपंग असूनही गिर्यारोहणात सातासमुद्रापार यश मिळवण्यास सज्ज असणारा अकोटचा दिव्यांग गिर्यारोहक धीरज कळसाईत हे विशेष अतिथी असणार आहेत

. ही मॅरेथॉन स्पर्धा तीन गटात होणार असून यात पहिला गट10 ते 15 वर्षे, दुसरा गट 16 ते 35 वर्षे व तिसरा गट 36 वर्षे ते खुला असणार आहे प्रत्येक गटातील विजेत्यांना स्पर्धेनंतर बक्षिस वितरित केले जाणार असून मॕरॉथॉन मधील प्रत्येक सहभागींना मेडल प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली .सहभागी स्पर्धकांसाठी स्पर्धा मार्गावर रुग्णवाहिका पाण्याची व्यवस्था असणार आहे तर मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही असणार आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृष्णा स्पोर्ट्स सेंट्रल बँक जवळ अकोला रोड आकोट ,अहीर झेरॉक्स नरसिंग मंदिर जवळ येथे स्पर्धक नोंदणी करू शकतात. स्पर्धक आरोग्याच्या काळजीसह बाल हक्क, शिक्षण आरोग्य महिलांवरील अन्याय अत्याचाराविरुद्ध विषयावरील जनजागृती पर पोस्टर वेशभूषा करू शकतात.या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सरर हे ओझोन हॉस्पिटल अकोला असणार असून शिवाजी महाविद्यालय सहयोगी संस्था असणार आहे.असे मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजन संदर्भात आयोजित या पत्रकार परिषदेत आयोजकांनी सांगीतले .स्पर्धेच्या यशस्वितेसाठी WAR फाऊंडेशनच्या भैरवी हींगणकर, प्रीती मासोदकर, मंजुषा टेंबझरे, माधवी सोनखासकर स्वाती वैद्य ,अश्विनी फोकमारे अर्चना हिंगणकर ,अर्चना काळे,विद्या लांडे, रंजना दिंडोकार, सविता भांबुरकर, माधवी मोहोकार,रजनी धनभर,अर्चना मानकर यांच्यासह वॉर च्या महीला सदस्या परीश्रम घेत आहेत.