आकोटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी केली वैकुंठ धाम येथे स्वच्छता

0
886
Google search engine
Google search engine

आकोट/ संतोष विणके

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवकांनी काल रवीवारी वैकुंठ धाम येथे स्वच्छता मोहीम राबवली. अजंनगाव रोडवरील वैकुंठ धाम येथे ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.आकोट नगरातील प्रभात शाखेच्या वतीने दि.१६डिसेंबर ला सकाळी ७.३०ते ९.३० वाजे पर्यंत रास्वसं स्वयंसेवकांनी ही स्वच्छता मोहीम राबवुन सेवा दिन साजरा केला.

आकोट नगरातील पाच प्रभात शाखेच्या वतीने हा सेवा दिन साजरा करण्यात आला. या मोहिमेत ४५ स्वयंसेवकांनी भाग घेतला.सर्व स्वयंसेवकानी वैकुंठ धाम परिसर स्वच्छ करुन.केर कचरा गोळा करून जाळला.त्याभागातील नागरीकांनी या कार्याची स्तुती केली.

स्वंयसेवकानी हे सगळ नावासाठी, पैशासाठी,स्तुती साठी केलं नसुन ते फक्त समाजासाठी, राष्ट्रसाठी, केलं हे सर्व बघून अनेकांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले.यासह अनेक नियमित कार्यात स्वंयसेवक सर्व कार्यक्रमात सहभागी होत असतात. यावेळी हा उपक्रम स्वच्छता अभियान म्हणून राबविण्यात आला. जनमानसात याची जागृती व्हावी या उद्धेशातून प्रभात शाखेच्या वतीने हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. असे अनेकप्रकारचे उपक्रम संघाद्वारे सातत्याने राबविण्यात येत असल्याचे सुत्रांनी सांगीतले.