आज उमठा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जीवन दर्शन घडविणारे क्रांतीनायक महानाट्य- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवा निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन !

0
1110
Google search engine
Google search engine

रुपेश वाळके / विशेष प्रतिनिधी /

जगाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण देणा-या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५० वा सुवर्ण पुण्यतिथी महोत्सव नरखेड तालुक्यातील गुरुदेव सेवाश्रम उमठा येथे येत्या १८ ते २२ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाला शासकीय अधिकारी , विविध खात्याचे आजी , माजी मंत्री, लोकप्रतिनिधी व गणमान्य व्यक्ती प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

पाच दिवस चालणा-या या महोत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक, समाज प्रबोधन, जनजागृतीपर कार्यक्रम होतील. मंगळवार १८ डिसेंबर रोजी तीर्थस्थापनेने महोत्सवाची सुरूवात झाली त्यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली .

आज शुक्रवार २१ डिसेंबर ला सायंकाळी ८ वाजता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जीवन दर्शन घडविणारे क्रांतीनक महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून महाराजांचे जीवन चरित्र लोकांपर्यंत पोहचहाविण्याचे कार्य गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून नागपूर येथील नामवंत ५० कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून विविध भावनिक प्रसंगाने नटलेल्या संस्कारमय नाटकात अंधश्रद्धा , ग्राम स्वच्छता , स्वतंत्र संग्राम , भजन , नृत्य , आदींच्या माध्यमातून जनजागृती व संस्कारमय नाटकाचा प्रयोग पहिल्यांदाच नरखेड तालुक्यात उमठा आज सादर येथे होणार असल्यामुळे तालुक्यातील नागिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या भव्य दिव्य कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन श्री गुरुदेव सेवाश्रम उमठा च्या वतीने करण्यात आले आहे .