अकोटचा खेळाडु यश निर्वाणची राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या महाराष्ट्र संघात वर्णी

427

आकोट/ संतोष विणके

भारतीय खेल महासंघाच्या वतीने आयोजित १७ वर्षा आतील अंतरशालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी अकोटचा युवा खेळाडु यश निर्वाण याची महाराष्ट्र संघात वर्णी लागली आहे. ही राष्ट्रीय स्पर्धा दिनांक २५ ते ३० डीसेम्बर २०१८ या कालावधीत बेमेतरा छत्तीसगढ़ येथे होत आहे. यश हा भाऊसाहेब पोटे विद्यालय अकोट चा विद्यार्थी असुन आकोटचा कोहिनूर खेळाडू म्हणुन यश प्रविण निर्वाण हा ओळखला जातो.या उपलब्धीने यशचे महाराष्ट्र संघात स्थान पक्के झाले असुन यश स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिरसाठी गोंदिया येथे रवाना झाला आह

े.यशच्या या उपलब्धीने
सर्व अकोट वासी आणि सॉफ्टबॉल प्रेमियांसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
यश हा सॉफ्टबॉल चा उत्कृष्ट खेळाडू असून अकोट चा होमर मैन म्हणून तो ओळखला जातो , तो आपला दैनंदिन सराव देशपांडे अकादमी अकोट येथे मुकुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनात करतो व त्याला या कामगिरी साठी भाऊसाहेब पोटे विद्यालय मधील सर्व शिक्षक वृंदानी शुभेच्छा दिल्या असुन देशपांडे अकादमीनेही आपल्या यशला अकादमी साठी सुवर्णपदक काबिज करण्यास शुभेच्छा दिल्या आहेत. यश हा अतिशय सुन्दर असा धावपटु देखील आहे.अकोट येथिल वॉकथॉन २०१७-१८ स्पर्धेचा तो द्वितीय विजेता ठरला होता हे विशेष

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।