कडेगांवच्या रुद्राक्षा फौंडेशनमार्फत वाघेरी ता.कराड येथे रक्तदान शिबिर संपन्न

0
869
Google search engine
Google search engine

दि.२१ डिसेंबर २०१८ रोजी वाघेरी (ता.कराड) येथे कै.सौ.पार्वती बाबुराव गुरव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कडेगांव जि.सांगली येथील रुद्राक्षा फौंडेशनमार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. फौंडेशनच्या संस्थापिका काजल हवलदार यांच्या अध्यक्षतेखाली ते संपन्न झाले.
त्यावेळी त्या म्हणाल्या, आजकाल अपघातांचे, खून-मारामाऱ्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे व यात निष्पाप जीवांचा अचानक रक्त न मिळाल्याने मृत्यू होतो. तसेच इतर बऱ्याच आजारांमध्येही रक्ताची गरज भासते. म्हणून आजच्या तरुण व सशक्त पिढीने वर्षातून कमीत कमी २ वेळा तरी रक्तदान करायला हवे. रक्तदान हे एक श्रेष्ठदान आहे. रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो.
या शिबिरात तरुण पिढीचा सक्रिय सहभाग दिसून आला. तसेच महिलांनीही रक्तदान केले.
यावेळी रुद्राक्षा फौंडेशनच्या अध्यक्षा काजल हवलदार, सदस्य सचिन हवलदार, सुरज गुरव, डॉ.गौरव सावंत, डॉ.कुलदीप चौधरी, डॉ.संतोष कोळी, डॉ.आकाश बंडगर, समीर डांगे, शुभम डांगे, शहाबाज पटेल, सुशांत माळी, अनिकेत माळी, समीर मुल्ला, गोरख काशीद, गणेश कदम, प्रदीप पाटोळे, कुणाल डांगे, किरण गुरव, गणेश कदम, महेश गुरव, किरण शिंदे, रोहित पवार आदी उपस्थित होते.