श्री दत्त पोर्णिमे निमित्त अकोटात भव्य रथयात्रा ; १५० वर्षाहुन अधिकची परंपरा

0
927
Google search engine
Google search engine

अकोट/संतोष विणके

श्री दत्त पोर्णिमे निमित्त अकोटात आज दि.23डीसे.ला भव्य रथयात्रा पार पडली.या रथयात्रेला १५० वर्षाहुन अधिकची परंपरा असल्याची भाविकांची माहीती आहे.यावेळी श्री दत्त गुरुंच्या दर्शनासाठी शहरातील भाविकांची गर्दी झाली होती. आज सकाळी केशवराज वेटाळातील श्रीदत्त मंदीरातुन नगरात रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मंदिर परिसरासह आस्थेवाईक भाविक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. या रथाची १५०वर्षा पासून नित्य नियमित पंरपरा सुरू आहे.
आज सकाळी श्रीदत्त रथाची मिरवणूक सुरुवात हभप चंद्रकांत देशपांडे, हभप सरोदे महाराज, रामा लबाडे यांच्या नेतृत्वाखाली भजन मंडळींच्या सानिध्यात रथाची मिरवणूक प्रारंभ झाला. रथयात्रा मिरवणूक तहसील रोड, बडा अलावा, जैन मंदिर, वणे वेटाळ, सोमवार वेस ,केशवराज वेटाळ,अशी फीरुन मंदिरात परत आली. आल्यानंतर गोपालकाला पार पडला.यादरम्यान दि.१६ते २४ डिसेंबर पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच मंदिरात भजन, गुरुचरित्र पारायण करण्यात आले होते.

यावेळी दिगांबरा,दिगांबरा श्रीपाद वल्लभ दिगांबरा च्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. याप्रसंगी भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. कार्यक्रमाची सांगता प्रसादाने करण्यात आली.