परंड्याच्या नगराध्यक्ष पदावर टांगती तलवार ? मनसेच्या जिल्हाअध्यक्षा वैशाली गायकवाड यांची जिल्हाधीकार्यांकडे तक्रार

0
3970

( छायाचित्रकार – राहुल कोरे /उस्मानाबाद )

परंड्याच्या नगराध्यक्ष पदावर टांगती तलवार ?
मनसेच्या जिल्हाअध्यक्षा वैशाली

गायकवाड यांची जिल्हाधीकार्यांकडे तक्रार

उस्मानाबाद / प्रतिनीधी

परंडा येथील नगराध्यक्ष जाकिर सौदागर यांनी पदाचा गैरवापर करून खोटा झोन दाखला तयार करून यलो झोन मधील जागा सर्वे नं २३४ /(ब) मुलाच्या नावे करून हडप केल्या प्रकरणी मनसेच्या हाती दोन्ही दाखले लागल्यामुळे मनसेने गेल्या महिनाभरापासून कागदपत्रासाठी पाठपूरावा करून आज २४/१२/२०१८( सोमवारी) मनसेच्या महिला आघाडिच्या जिल्हाअध्यक्षा वैशाली गायकवाड यांनी मनसेच्या पदाधिकारी यांना घेऊन जिल्हाधिकार्यांकडे तक्रार दाखल केली आहे.तक्रारीत मौजे परंडा येथील सर्वे नं २३४ / ब हि जागा शासकिय आरक्षीत केली असताना सदरची जागा हडपण्याच्या उद्देशाने नगराध्यक्ष जाकिर सौदागर ,मुख्याधिकारी व कर्मचार्यांनी संगणमत करुन बनावट कागदपत्रे तयार केले आसून संबंधीत प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे व नगराध्यक्षांना तात्काळ अपात्र घोषित करून दोषी कर्मचार्यांना निलंबीत करावे अशी तक्रारीत मागणी करण्यात आली आहे या तक्ररीमुळे राजकिय गोटात मोठी खळबळ उडाली आहे.गेल्या महिन्यापासून नगराध्यक्ष जाकिर सौदागर यांच्या पदाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली तर आहेच परंतू बर्याच जणांनी देव पाण्यात ठेवले आहेत. काही मंडळींना तर फारच आता पुढच्या निकालाची अतुरता लागली आहे . मध्यंतरी मनसे तक्रार दाखल करणार का नाही ? अशीही उलट सुलट चर्चा सुरु होती . गेल्या काही महिण्यापूर्वी उस्मानाबाद येथील शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या विरोधात मनसेच्या जिल्हाअध्यक्ष खळखट्याक फेम वैशाली गायकवाड व राजेंद्र गपाट यांनी मनसेच्या कार्यकरत्यांना घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता . त्यामुळे वैशाली गायकवाड यांची ढँशिंग मनसे जिल्हाअध्यक्ष म्हणुन ओळख आहे . शेवटी आज अखेर मनसेने जिल्हाधिकार्यांकडे तक्रार दाखल केल्याने परत चर्चेला उधाण आले आहे. तक्रार दाखल करतेवेळी जिल्ह्यातील मनसेचे पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते