अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने ग्राहक दिन साजरा

0
1158

आकोट /प्रतीनिधी

अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने दि.24 ला अकोट शहरात ग्राहक दिन साजरा करण्यात आला.

आकोट येथील टारगेट अँकडमी येथे आयोजीत या कार्यक्रमात फसवणूक झालेल्या ग्राहकांच्या हक्क साठी ग्राहकांनी जागृत राहिले पाहिजे व त्यासाठी ग्राहक पंचायत ही संघटना कार्य करीत आहे. असे मत आकोट ग्राहक पंचायत चे सचिव अँड संजय पाठक यांनी व्यक्त केले.

ग्राहकांना योग्य न्याय मिळण्यासाठी अ.भा.ग्राहक पंचायत व जिल्हा च्या ठिकाणी ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यरत आहे. याठिकाणी ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करण्यात येते. असे मत अँड पाठक यांनी यावेळी व्यक्त केले.

याप्रसंगी आकोट ग्राहक पंचायत चे अध्यक्ष ओमप्रकाश हेडा, सचिव अँड संजय पाठक, अँड बाळासाहेब आसरकर टारगेट अँकडमी चे संस्थापक प्रा. कैलास वर्मा ,अरुणराव सांगळुदकर, वामन जकाते उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परीचय प्रा.वर्मा सर यांनी करून दिला. व ग्राहक संरक्षण कायदे संबंध माहिती दिली

अँड बाळासाहेब आसरकर यांनी दैनंदिन व्यवहारात ग्राहकांनी जागृत रहावे लागते. युवा पिढीने याकडे दुर्लक्ष करु नये.ग्राहकांना योग्य किमतीत वस्तू मिळाव्यात आणि सर्व वस्तू चे उत्पादन मुल्य ग्राहकांना जाणून घेण्याचा अधिकार मिळावा यासाठी लोक सभेत सरकारने ग्राहक संरक्षण कायदा परित केला.म्हणून दि.२४ डिसेंबर ला राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.अशी माहीती दिली. श्री.ओमप्रकाश हेडा यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना ग्राहकांच्या हितासाठी सर्वतोपरी आम्ही प्रयत्न करत असतो.असे सांगितले.कार्यक्रमात मोठ्या संख्येने क्लास चे विद्यार्थीनी व विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षार्थ्याना सुध्दा ग्राहक संरक्षण कायदा ची माहिती देण्यात आली. यासाठी अर्ज कसा केला जातो ते सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.रोहिणी काळे,अभार प्रदर्शन निझवाल खान यांनी केले.असे आयोजकांनी कळवले आहे..