नळदुर्गमध्ये तुंबळ हाणामारी ,चार गंभीर ; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
6240

नळदुर्ग :- मागील भांडणाच्या रोष मनात ठेवून लोखंडी राड ,चाकू, लाकडी काठीने मारहाण करून चार जणांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीतील गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की 24 डिसेंबर रोजी रात्री सव्वासात वाजण्याच्या सुमारास अक्षय हजारे राहणार मराठागल्ली नळदुर्ग हा युवक ट्यूशन वरून घरी येत असताना मागील भांडणाच्या रोष मनात धरून फिर्यादी व यातील जखमींना अशितोष नाईक ,अप्पू थोंटे,ओमकार बागल ,मयूर फुलगे, उमेश अवचार प्रतीक चव्हाण सुजित बिराजदार सर्व राहणार ब्राम्हण गल्ली नळदुर्ग यांनी लोखंडी राड,चाकु, लाकडी काठीने मारुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद संदीप सुरेश हजारे यांने 25 डिसेंबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिल्यावरुन वरील सातजणां विरोधात कलम 307,143,144,147,148,324,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए.पी.खोडेवाड हे करीत आहेत.