परळीची इज्जत पुन्हा वेशीला…!

0
928
Google search engine
Google search engine

परळीत अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे सत्र सुरूच

परळी वैजनाथ (प्रतिनिधी ).परळी तालुक्यातील सारडगाव येथील एक अल्पवयीन मुलगी शेतातील पाण्याची मोटार चालु करण्यासाठी गेली असता मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मोटारसायकलवर जबरदस्तीने पळवून नेल्याचा किळसवाणा प्रकार परळी तालुक्यातील सारडगाव येथे घडला आहे. या आरोपी विरोधात पिडित मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपी श्रीकृष्ण आत्माराम नागरगोजे (वय १९)व त्याचा चुलतभाऊ. मुंजाजी तुकाराम नागरगोजे (वय २७) रा दोघेही नागापुर ता परळी येथील असुन पोलिसांनी दोन आरोपीला ताब्यात घेतले. सदरील आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 376,363,366(अ),507,34 सह बाल लैंगिक प्रतिबंध संरक्षण कायद्याचे कलम 4, 8, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. परळीत सतत होत असलेल्या गुन्ह्यांकडे बीड चे अधीक्षक लक्ष देणार का अशी चर्चा परळीत आहे सदर प्रकरणाचा तपास परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विकास आडे करीत आहेत.