ढोकीत प्रमुख राजकिय पुढार्यात तुबळ हाणामारी ; पोलिंसांचा सौम्य लाठिमार

0
3391
Google search engine
Google search engine

ढोकीत समुद्रे व देशमुख गटात शाब्दिक चकमक ; पोलिंसांचा सौम्य लाठिमार

उस्मानाबाद /प्रतिनिधी- उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील बस स्थानकावर प्रवासी निवारा शेडच्या जागेवरून राजकिय पुढार्यात तुबळ हाणामारी झाली हि घटना आज दि.२५ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता घडली. दरम्यान ढोकि पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणपत जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिस बळाचा वापर करून सौम्य लाठीमार करुन जमावाला आटोक्यात आणल्यामुळे होणारा मोठा अनर्थ टळला .
ढोकी येथील बस स्थानकावर प्रवासी निवारा शेड साठी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या निधीतून अडीच लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. या प्रवासी शेडचे भुमीपुजन मंगळवारी सकाळी मजुर फेडरेशनचे अध्यक्ष अ. गफ्फार काझी, पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, उपसरपंच अमोल समुद्रे , समद शेख,यांच्या हस्ते झाले.
किशोर तिवारी हे शेडचे मार्कआउट टाकत असताना खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख हे आले तु हे मार्कआउट माझ्या दुकानासमोर कुणाला विचारुन निवारा शेडचा मार्कआउट टाकत आहे. तेथे उपस्थित उपसरपंच अमोल समुद्रे व देशमुख यांच्यात शाब्दिक चकमक उडाली व त्यातुन भांडण झाले.भांडणाची माहिती गावात वा-यासारखी पसरली देशमुख समर्थक व समुद्रे समर्थक जमा झाले. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी जमाव बंदी आदेश लागू करुन पोलीसांनी गाडीतून माईकवरुन लोकांना जमाव बंदीचे सुचना दिल्या .
सहाय्यक पोलिस निरिक्षक गणपत जाधव यांनी समुद्रे समर्थक व देशमुख समर्थक यांना पोलीस ठाण्यात शांतता कमेटिची बैठक घेतली व शांतता राखण्याचे आवाहन केले . दोन्ही गट पोलीस ठाण्याच्या आवारात भिडल्यामुळे पोलिसांनी दोन्ही गटाला लाठीमार करून दोन्ही गटातील समर्थकांना पांगवण्यात आले . काही काळ ढोकि गावात तणाव निर्माण झाला होता परंतू सहाय्यक पोलिस निरिक्षक जाधव यांनी पोलिसांना घेऊन संपूर्ण गावची पाहणी करून शांतता ठेवली आहे. ढोकिच्या पोलिसांनी सतर्कता बाळगल्यामुळे मोठा होणारा वाद टळला.