लेट दिवाली बेन सेदाणी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन OPUS 2018 संपन्न

0
1191

आकोट/संतोष विणके

शहरातील पोपटखेड मार्गावरील लेट दिवाली बेन सेदाणी इंग्लिश स्कूल (LDS) तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन Opus 2018 हे दिनांक 20 डिसें. ते 22 डिसें. दरम्यान उत्साहात पार पडले.अल्पावधीतच शहरातील नामांकित स्कूल म्हणून नावारूपास आलेल्या सेदाणी स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे लोअर केजी ते दहाव्या वर्गापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध कार्यक्रमांद्वारे दणक्यात साजरे झाले.

या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची थिम Opus या संकल्पनेवर आधारित होती. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन गुरुवार दि. 20 डिसेंबर ला मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे व उद्घाटक नॅशनल ट्रेनर शिरीष वंजारा ,उद्योजक नंदकिशोर शेगोकार संस्था अध्यक्ष स्मिता सेदाणी, संस्थापक संचालक सुरेश सेदाणी, ज्येष्ठ मार्गदर्शक भानुभाई सेदाणी, सचिव नितुल सेदाणी, प्राचार्य विजय भागवतकर,डॉ. प्रशांत इंगळे माध्य. प्राचार्य प्रशांत मंगळे, प्राथ. मुख्याध्यापिका स्नेहल अभ्यंकर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने उद्घाटन पार पडले. संस्थेच्या वतीने मान्यवर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी प्राचार्य विजय भागवतकर यांनी प्रास्ताविक परिचय देत संस्थेच्या प्रगतीबद्दल उपस्थित पाहुणे पालक विद्यार्थ्यांना माहिती दिली. यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक नॅशनल ट्रेनर शिरीष वंजारा यांनी विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनातून घडणाऱ्या व्यक्तिमत्व विकासाबाबत अवगत केले तसेच आनंदा सोबत अभ्यास हा जीवनातील यशाचे सूत्र असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले,

तदनंतर संस्था अध्यक्षा स्मिता सेदाणी यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीबद्दल आश्वस्त केले तर सुरेश सेदाणी यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करण्याचा सल्ला दिला. डॉ.प्रशांत इंगळे यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.नंदकिशोर शेगोकार यांनी आपले विचार मांडताना संस्थेच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

उद्घाटन कार्यक्रमानंतर सोलो डान्स स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली रॉकी बत्रा,पुनम ठक्कर स्पर्धेला परीक्षक होते दि.21 डीसे.ला संध्याकाळी 5 वाजता ग्रुप डान्स परफॉर्मन्स कार्यक्रमाचे उद्घाटन अॕड महेश गणगणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी विद्यार्थीसाठी मोठ्या संख्येने हजर असणार्‍या पालकांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात

दि. 22 डिसें. च्या समारोप कार्यक्रम प्रसंगी पीएसआय आशिष षशिंदे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षक सन्मान तथा समूहनृत्य स्पर्धा पार पडली.तीन दिवसीय पार पडलेल्या Opus 2018 स्नेहसंमेलनात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, धमाल मनोरंजन तथा विविध स्पर्धा पार पडल्या. तीन दिवस पालक-विद्यार्थी पाहुणे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजेरी होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.