आता उमरग्यात भाईगीरी / छेडछाड होणार सी सी टिव्हीत कैद

0
1253
Google search engine
Google search engine

आता उमरग्यात भाईगीरी / छेडछाड होणार सी सी टिव्हीत कैदउमरगा शहरात सी सी टिव्ही नियंत्रण कक्षाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्या हस्ते उदघाटन

उस्मानाबाद – उमरगा शहरातील विवीध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती ,स्वंसेवी संस्था ,संघटना व्यापारी , डाँक्टर ,प्राध्यापक ,शिक्षक , सामान्य नागरीक यांच्या पुढाकारातून अंदाजे पंधरा ते सोहळा लाख रुपये खर्च करून जवळपास शहरात ६४ सी सी टि व्हि कँमेरे बसवण्याचा संकल्प केला होता त्यापैकी ४४ कँमेरे बसवून त्याचे नियंत्रण हे उमरगा पोलिसामार्फत करण्यात येणार आसल्यामुळे उमरगा पोलिस ठाण्यात नियंत्रण कक्षाचे आज ता २६ ( बुधवारी) भव्य उदघाटन करण्यात आलेउमरगा येथे शहरात विविध मुख्य ठिकाणी बसविण्यात आलेल्या CCTV च्या नियंत्रण कक्षाचे उदघाटन केल्यामुळे आता शहरातील विवीध ठिकाणी मोकाट रोडरोमीयो , गुंडगीरी , चोर्यामार्या , आदी घटना या कँमेर्यात कैद होणार असल्यामुळे आता अशा घटनेवर सी सी टिव्ही नियंत्रण कक्षाची करडी नजर राहणार आहे .त्यामुळे व्यापारी, महिला विद्यार्थीनी आदिंना याचा मोठा फायदा होणार आहे.उमरगा पोलिस रोटरी क्लब व्यापारी माहासंघ .आय एम आय , आणि उमरगा डिबेट वाँटसाप ग्रुप यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला .यावेळी उस्मानाबाद चे पोलिस अधिक्षक आर राजा , उप विभागिय पोलिस आधिकारी राहुल धस यांच्यासह उमरगा पोलिस ठाण्याचे आधिकारी कर्मचारी व शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते .