वाट हरवलेल्या आदीवासी चिमुकलीसाठी ट्राफीक पोलीस ठरलेत देवदुत

0
1536
Google search engine
Google search engine

आकोट/ प्रतीनीधी

आज अकोट शहरात दुपारच्या सुमारास एक ५ वर्षे वयाची आदीवासी मुलगी वाट हरवल्याने रडत असतांना या चिमुकलीसाठी ट्राफीक पोलीस देवदुत ठरलेत.सुत्रांच्या वतीने मिळालेल्या माहीतीनुसार ट्राफीक कर्मचारी जगदीपसिंह ठाकूर पोकॉ गणेश फोकमारे पोकॉ अनिल लापुरकर शिवाजी चॊक येथे ड्युटी करीत असताना त्यांना एक अंदाजे 4 ते 5 वर्षाची मुलगी इशियानी भिलावेकर ही रडत रडत शिवाजी चौका कडून बस स्टॅन्ड कडे जाताना दिसली तिला त्यांनी विचारपूस केली असता तिला पूर्ण बोलता येत नव्हते तिच्या भाषे वरून ती आदिवासी असल्याचे लक्षात आल्याने पो.नी.महल्ले यांचे आदेशाने पोस्टे ला माहिती देऊन ट्राफीक कर्मचाऱ्यांनी स्वतः मुलीला मोटारसायकल वर घेऊन शहरामध्ये पेट्रोलिंग केली.

यादरम्यान सियाराम रेडिमेड जवळ एक म्हातारी त्या मुलीला पोलीसांच्या गाडीवर बसलेले पाहून तीने माझी नातं असल्याचे पोलीसांना सांगितले व तिची आई तिला शोधण्यासाठी गेली असल्याचे सांगितले. म्हातारी व ती मुलगी तिच्या आईला शोधण्यासाठी आटो मध्ये बसून निघाली असता म्हातारीने तिच्या आई ला ओळखले.अन ताटातुट झालेल्या सर्व मायलेकांची भेट झाली. यावेळी मुलीला तिच्या आईच्या व आजीच्या ताब्यात देण्यात आले
या भेटीने तीची आई देविका रमेश भिलावेकर रा गुलाई हीचे अश्रु वाहत होते यावेळी तिने अकोट शहर पोलीस व ट्राफिक कर्मचाऱ्यांचे आभार मानले