अकोट तालुका मराठा सेवा संघाच्या विस्तारित कार्यकारीणीची बैठक संपन्न

0
755
Google search engine
Google search engine

आत्महत्याग्रस्त कुटूंबांना आधार द्यावा- अशोक पटोकार

आकोट/प्रतीनीधी

मराठा सेवा संघाची विचारधारा ही समाजमनापर्यंत पोहोचविण्यासाठी सजगतेने काम उभे झाले पाहीजे.समाजाशी एकरुप होवून मराठा समाजाला दिशादर्शनाची भूमिका पार पाडणे तथा त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी संघटीत व्हा विशेषतः आत्महत्याग्रस्त कुटूंबाचे पाठीशी शक्तीनिशी ठामपणे उभे रहावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री अशोकराव पटोकार यांनी केले.

मराठा सेवा संघ आकोट तालुका शाखेच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत ‘मराठा सेवा संघाची विचारधारा’ या विषयावर मार्गदर्शन करतांना अशोकराव पटोकार बोलत होते.मराठा सेवा संघ आणि ३३विविध कक्षाचे कार्यपद्धती व संघटनात्मक बांधणी याबाबत त्यांनी उद्बोधन केले.

या सभेत मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष शिवश्री राजेश कुलट यांनी नुतन कार्यकारिणी व विविध कक्ष प्रमुख जाहीर करण्यात आली.तर जिल्हा कार्यकारीणीवर प्रा.डि.आर.साबळे यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

या सभेत प्रा.प्रदिप चोरे ,युवा नेते अॕड.मनोज खंडारे,नगरसेवक विवेक बोचे,श्रीकांत गायगोले,प्रा.डी.आर.साबळे,
नंदकिशोर हिंगणकर उद्योजक कक्षाचे अध्यक्ष अविनाश डिक्कर, प्रा.वाल्मिक भगत,
यांची समायोचित भाषणे झालीत.

सभेचे सुत्रसंचालन तालुका सचिव प्रविण वानखडे यांनी तर आभार प्रदर्शन शरद पांडे यांनी केले.

सभेला कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष शिवश्री गजानन चोपडे,अनंत गावंडे,जिल्हा कार्यालयीन सचिव देशमुख,प्रदिप रावणकार,गजानन महल्ले, प्रा.प्रफुल्ल देशमुख,सुभाष माळी,प्रशांत धाबे,हिम्मत गावंडे,रविंद्र कापसे,गोपाल नारे,अनिल सावरकर,मंगेश अवारे,राहूल जायले,ओमप्रकाश बोके,संजय शेळके,गणेश डिक्कर,संदिप वक्ते,मनोज चोरे,आदीसह जिजाऊ ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड,शिक्षण परिषद तथा उद्योजक कक्षाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.