नरखेड तालुक्यातील पेठ मुक्तापुर येथील उच्च प्राथमिक शाळेचा आदर्श  ‘अनोखा उपक्रम !    नरखेड तालुक्यातील एकमेव आदर्श शाळा !     शिक्षकांच्या सामूहिक प्रयत्नातून शाळेचा कायापालट;  शाळेतील पटसंख्या वाढली !

0
1684
Google search engine
Google search engine

पेठ मुक्तापुर येथील उच्च प्राथमिक शाळेचा आदर्श अनोखा उपक्रम !

नरखेड तालुक्यातील एकमेव आदर्श शाळा !

शिक्षकांच्या सामूहिक प्रयत्नातून शाळेचा कायापालट; शाळेतील पटसंख्या वाढली !

जलालखेडा प्रतिनिधी /

विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी आदर्श शाळा कशी असावी असा प्रश्न पडल्यास नागपूर जिल्ह्य़ातील नरखेड तालुक्यातील पेठ मुक्तापुर येथील जिल्हा परिषद शाळा हे उत्तम उदाहरण ठरेल.

या शाळेत शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शाळेच्या व्यतिरिक्त वेळेतही शिक्षणाचे धडे दिले जातात. अल्पकालावधीतच शिक्षक व ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नाने या शाळेचा कायापालट झाला. त्यातूनच इंग्रजी माध्यमाच्या संस्कृतीकडे वळणारी पावले पेठ मुक्तापुर उच्च माध्यमिक जिल्हा परिषद शाळेकडे वळू लागली आणि या वर्षी शाळेवर वाढीव पटसंख्येचा फलक झळकला.

शिक्षणच्या खालावलेल्या दर्जातून राज्यातील जिल्हा परिषदेच्या किंवा महापालिका, नगर पालिकांच्या शाळा कालबाह्य़ होत आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेची संस्कृती मोडकळीस निघत आहे. याला काही अपवादही आहेत. असाच अपवाद ठरली आहे नागपूर जिल्ह्य़ातील नरखेड तालुक्यातील पेठ मुक्तापुर येथील जिल्हा परिषदेची शाळा.

एक हजार दोनशे लोकसंख्या असलेल्या पेठ मुक्तापुर गावात गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेची शाळा आहे. काही वर्षांपूर्वी या जिल्हा परिषद शाळेचीही इतर शासकीय शाळेप्रमाणाचे दयनीय अवस्था होती. त्यामुळे गावातील बहुतांश पालक आपले पाल्य गावापासून दूरवर शहरातील शाळेत पाठवत होते. गावाच्या आणि शाळेच्या सुदैवाने मुख्याध्यापक शिक्षक यानिमित्ताने एकत्र आले. त्यासाठी त्यांनी स्वत: जवळील पैसे गोळा केले. शिक्षकांच्या या विधायक कार्याला गावकऱ्यांनीही एकदिलाने साथ दिली व या कार्यात शिक्षकांनी अनमोल वाटा उचलला. त्या माध्यमातून शाळेचा कायापालट करण्यात आला. शाळेची रंगरंगोटी,भिंतीवरील बोलकी चित्र प्रदर्शनी विध्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे शिकवितांना दिसत आहे , शाळेमध्ये विविध रंगांची फुलझाडे , शाळेतील विध्यार्थ्यांना खेळाच्या सेवा सुविधा , मुलभूत सोयीसुविधा करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त अशा अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आल्या. भौतिक सुविधांची व्यवस्था झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी लक्ष्य केंद्रित करण्यात आले. मागील वर्षी या शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा आपला ठसा उमटवीला असून मागील वर्षी जिल्हा क्रीडा सर्धेमध्ये ४ मेडल प्राप्त करून खोखो , कबड्डी यासारख्या खेळामध्ये येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. यासाठी शिक्षकांनी पूर्ण वेळ शाळेसाठी देऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचे अनमोल कार्य करतांना दिसत आहे .या शाळेमध्ये विध्यार्थ्यांकरिता वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून शिक्षणाचे धडे दिले जातात.

या शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत वर्ग आहेत. गेल्या वर्षी या शाळेची ७६ पटसंख्या होती. शाळेची नावलौकिकता वाढल्यामुळे आता पटसंख्या ही तब्बल १०२ च्या पुढे गेली आहे. नरखेड तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये असा उपक्रम राबविल्यास एखाद्या नामांकित खासगी शाळेप्रमाणे या जिल्हा परिषद शाळेवर देखीलहाऊसफुल्लचा फलक लावल्या जाऊ शकतो. पाच शिक्षकांचे परिश्रम आणि त्याला गावकऱ्यांची मिळालेली साथ यामुळे एका वर्षांत या शाळेच रूपडं पालटलं. शाळेचे मुख्याध्यापक सुनील शेंदरे, सहकारी शिक्षक विवेक बोरकर, उषा मेहतकर, नरेंद्र राऊत,विमल नागमोते, यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीने शाळेत व्यापक परिवर्तन आणण्याचा निर्धार केला. या शिक्षकांनी स्वत: मेहनत करून शाळेला एक नव रूप दिले. यासाठी ग्रामपंचायतने ही सकारात्मक पाउल उचलत शिक्षकांच्या या उपक्रमाला सहकार्य केले व गावातील विद्यार्थ्यांना शाळेत टाकण्यास सहकार्य केले.

इतर शाळेत असा पॅटर्न कधी राबविनार ?

पेठ मुक्तापुर येथील जिल्हा परिषद शाळा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असून, या शाळेचा पॅटर्न अन्य जिल्हा परिषद शाळेत राबविण्याचा निर्धार नागपूर जिल्हा परिषद प्रशासनाने करायला हवा . पेठ मुक्तापुर जिल्हा परिषद शाळेत अनोखे उपक्रम राबविल्याने आणि शाळेत आवश्यक त्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध झाल्याने विद्यार्थी आनंदाने हसत खेळत शिक्षण घेतांना दिसत . पेठ मुक्तापुर येथील शाळेचा हा उपक्रम जिल्हय़ातील अन्य जिल्हा परिषद शाळांनी राबविल्यास जिल्हा परिषद शाळांवर पालकांचा विश्वास बसेल अशी अपेक्षा आहे.

आम्ही शिक्षकांनी एकत्र येत शाळेत परिवर्तन घडवण्याला सुरुवात केली. गावकऱ्यांची अनमोल साथ मिळाली, त्यामुळे हे शक्य झाले. शाळेतील विद्यार्थ्यांना हसत खेळत दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वसुविधा पुरवण्याचा आम्ही सर्व शिक्षक प्रयत्न करीत आहे . — सुनील शेंदरे मुख्याध्यापक उच्च प्राथमिक शाळा पेठ मुक्तापुर , ता नरखेड.

नरखेड पंचायत समितीचे सभापती राजेंद्र हरणे यांनी सांगितले पेठ मुक्तापूर येथील जिल्हा परिषदेची शाळा ही आदर्श शाळा झाली त्यामुळे तेथील शिक्षक व गावकर्यांचे करावे तितके अभिनंदन आहे. याच प्रकारचा उपक्रम संपूर्ण तालुक्यात राबविण्याचा प्रयत्न यानिमित्याने सुरु झाला आहे.