जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची कौतुकास्पद कामगिरी

0
722
Google search engine
Google search engine

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची कौतुकास्पद कामगिरी

उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा समुद्रवाणी येथील कर्मचाऱ्यांनी आजरात्री उशीरापर्यंत थांबून शेवटच्या शेतकऱ्यांचा पीक विमा प्रस्तावांचा स्वीकार करुन विमा रकमेचा भरणा करुन घेतला.
विशेष म्हणजे आज दुपारी २-५३ पर्यंत बीएसएनएल चे नेटवर्क बंद होते तरी त्यांनी सकाळपासुनच पर्यायी जिओचे नेटवर्क वापरुन भरणा चालु ठेवला होता.बाहेर खाजगी सेतु सुविधा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांकडुन प्रत्येकी १०० रुपये जादा वसुली करुन शेतकऱ्यांची लुट केली. असे असतानाही जि.म.सह.बँकेने मात्र शेतकऱ्यांना मोफत सेवा दिली.
समुद्रवाणी शाखेत आतापर्यंत ४९६ शेतकऱ्यांचे प्रस्तावासह ३ लाख ४४ हजार आठशे दहा रुपयांचा भरणा केला असल्याचे शाखाधिकारी पठाण एन.ए.व तपासणीस गडकर टी.एस. यांनी माहिती दिली.याकामी डी.व्ही.मोहिते,एस.जी.माळी,ए.जे.कंदले,व्यंकट अंधारे या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.