लोकजागर मंच तर्फे नववर्षाच्या स्वागतात अकोटात दूध पार्टी

0
1777
Google search engine
Google search engine

आकोट/संतोष विणके

शहरातील विविध रचनात्मक उपक्रम राबवणारे लोकजागर मंचने नववर्षाच्या स्वागतात अनोख्या दुध पार्टीचे आयोजन 31 डीसें.ला करण्यात आले होते. येथील शिवाजी महाराज चौक येथे हे आयोजन करण्यात आले होते, युवकांनी या पार्टीला मोठ्या संख्येने हजेरी लावून प्रचंड प्रतिसाद दिला.

31 डिसेंबरच्या रात्री नव्या वर्षाच्या स्वागताचे निमित्त करून सर्वत्र दारू पार्ट्या आयोजित केल्या जात असताना , लोकजागरच्या या उपक्रमाचे आकोटात सर्वत्र कौतुक झाले,खास करून पालकवर्गाने या चांगल्या उपक्रमाबद्दल लोकजागरचे
संस्थापक अनिलभाऊ गावंडे वा त्यांच्या चमुचे आभार मानले.

लोकजागरने अकोट, हिवरखेड आणि तेल्हारा या तीन ठिकाणी ही दूध पार्टी आयोजित केली होती. यादिवशी बंदोबस्त
राखतानाही पोलिसांच्या नाकी नऊ येतात. म्हणूनच लोकजागरच्या दूध पार्टीची संकल्पना पोलिसांनाही खूप आवडली. अकोटचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात
शिवाजी चौकात आयोजित कार्यक्रमाला अकोट शहर चे ठाणेदार संतोष महल्ले यांनी हजेरी लावली होती.

याठिकाणी लोकजागरचे कार्याध्यक्ष एड सुधाकर खुमकर सरचिटणीस पुरुषोत्तम अवारे,जिल्हाध्यक्ष गजानन बोरोकार, शहराध्यक्ष सुरज शेंडोकार,अनंतराव सपकाळ,राजू गावंडे , आकाश बरेठिया, योगेश जायले, अर्जुन गाळखे,अमित डोबाळे,आनंद रोडे, मयूर भगत,रौनक जयस्वाल, श्रीजित गडम, श्याम पाथ्रीकर, निशांत खवले, शुभम गावंडे, चेतन गुरेकार, देवा कायवाटे, सुधीर भिल, जाकीर खान,रोशन भगत,शुभम बोरोकार,सौरभ थिटे,सागर गडम,मुजाहिद खान विनोद रेळे, साजिद खान, प्रतीक ढोले, संजय रेळे, शुभम खवले,रमेश शेंडे, केशव लोखंडे, श्याम राठी,शुभम खवले
पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अनेकांनी या अभिनव उपक्रमाचा लाभ घेतले.