तिरुपती ग्रुपच्या द्वारा सुस्वर कराओके गायनाने नववर्षाचे स्वागत

0
1370
Google search engine
Google search engine

आकोट/प्रतीनिधी

तिरुपती गृपच्या वतीने सुस्वर कराओकेच्या गायनाने नववर्षाचे स्वागत करण्यात आले.तिरुपती गृप द्वारा वर्षभर सामाजिक उपक्रम शहरांतर्गत सदैव चालूच असतात याहीवर्षी तिरुपती ग्रुपच्यावतीने कराओके गीत गायनाचा कार्यक्रम सादर करून नववर्षाचे अनोखे स्वागत करण्यात आले. गेल्या आठ-दहा वर्षापासून तिरुपती ग्रुप अकोट परिसरातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे तसेच नवकलाकारांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा हाच ग्रुपचा मुख्य उद्देश असतो

या वर्षाच्या कराओके गीत गायन कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे माजी नगराध्यक्ष प्रमुख उपस्थिती तुषार पुंडकर प्रहार जिल्हाध्यक्ष तसेच मुंबईमध्ये स्थायिक होऊन सिनेसृष्टीत आपले स्थान निर्माण करणारे ज्युनिअर अनिल कपूर आरीफ खान यांची उपस्थिती होती. हास्यविनोद व अनिल कपूर यांच्या आवाजातील संवादांनी रसिकांच्या चेहर्‍यावर प्रसन्न मुद्रेचे भाव यावेळी स्पष्ट दिसत होते. कराओके गीत गाण्यासाठी गणेश पाचपोर पोलीस उपनिरीक्षक, आदर्श अग्रवाल, जावेद अली शेख, कैसर ,गजानन कुकडे ,राजेंद्र गजानन तायडे,व कलावंतांच्या देशभक्तीपर गीतांनी झाली.

या बहारदार कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक तुषार अढाऊ यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू ढोले,निलेश चंदन, योगेश वाकोडे, प्रवीण यादव ,संजय ढोले ,गजानन भगत ,सहर्ष हाडोळे,अग्रवाल यांनी परिश्रम घेतले यावेळी मान्यवर व कलावंतांचे आभार बंडुभाऊ सिरसाट यांनी मानले.