शिवाजी कनिष्ठ महाविद्यालच्या विद्यार्थ्यांनी गीरवले मतदानाचे धडे

0
883
Google search engine
Google search engine

आकोट/संतोष विणके

येणार काळ हा निवडणूकाचा..! त्यामुळे मतदारांमध्ये अनेक शंका कुशंका निर्माण होतात, होणारी निवडणूक ही पारदर्शक होईल की नाही,याचीही चर्चा जास्त होतें, ही गोष्ट हेरून शासनाने मतदार जनजागृती चा कार्यक्रम हाती घेतला आहे. याच मतदार जनजागृती कार्यक्रमाचे प्रात्यक्षिक स्थानिक श्री शिवाजी क.म.वि.आकोट येथे दि.4जाने.ला करण्यात आले,

त्यावेळी EVM मशीनची माहिती विध्यार्थ्यांना देण्यात आली.विध्यार्थ्यांनि अतिशय कुतूहलाने मशीनची माहिती घेतली,त्यानंतर दुसरी मशीन VV PAT. मध्ये आपण दिलेल्या मतदानाचे चित्रण बघून खात्री करून घेतली,अशा प्रकारे मतदान पारदर्शक झाल्याचे लक्षात येऊन मतदारराजा निश्चित होतो,अशी माहिती राजेश गुरव नायब तहसीलदार यांनी विध्यार्थ्यांना यावेळी दिली,

यावेळीं प्रा माया कोरपे-म्हैसने यांनी विध्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया समजाऊन सांगितली, या कार्यक्रमास प्रवीण मेहरे,निलेश वाघमारे, राजेंद्र चौधरी, योजना वाकोडे,तलाठी आशेर परमार्थ आदी शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती,कार्यक्रमाला प्रा कुलट ,प्रा,बोरकर,प्रा धर्माळे, प्रा ओलांबे,प्रा प्रतिभा उमरकर,प्रा उज्वला कुलट ,सुलभा काळे,ममता इंगोले व वर्ग 11 व 12 वि कला शाखेचे विध्यार्थी व विध्यार्थीनी उपस्थित होते.