अमरावती – ६ जानेवारी या दिवशी ग्रामपंचायतीचे मैदान, नांदगाव पेठ आणि २७ जानेवारी या दिवशी संत गाडगेबाबा मंदिरासमोरील मैदान, गाडगेनगर, अमरावती येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन हिंदु जनजागृती समितीकडून करण्यात आले आहे. या दोन्ही सभा निर्विघ्नपणे पार पडाव्या आणि जिल्ह्यातील धर्मप्रेमींचे मोठ्या संख्येने संघटन व्हावे, यासाठी अमरावतीची ग्रामदेवता श्री अंबादेवी आणि श्री एकवीरादेवी यांना ओटी भरून साकडे घालण्यात आले. या वेळी सनातनचे संत, विदर्भ आणि छत्तीसगढ राज्य प्रसारसेवक पू. अशोक पात्रीकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. सनातन संस्थेच्या सौ. विभा चौधरी यांनी देवीची ओटी भरली. या वेळी सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत योग वेदांत सेवा समितीचे श्री. मानव बुद्धदेव, हिंदु महासभेचे नितीन व्यास, हिंदु क्रांती सेनेचे विदर्भ समन्वयक राज गणेशकर, शिवसेनेच्या सौ. कांचन ठाकूर, राष्ट्रीय बजरंग दलप्रणीत ओजस्विनी संघटनेच्या कु. मृणाली पाटील यांची उपस्थिती होती.
Home आपला विदर्भ अमरावती उद्या नांदगाव पेठ येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा – कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी...