उद्या पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांचा अमरावती येथे विदर्भस्तरीय मेळावा – आ. रवि राणा करणार मार्गदर्शन

0
1680
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम व गडचिरोली या ११ जिल्ह्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या विदर्भस्तरीय मेळाव्याचे आयोजन उद्या ६ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता भातकुली तहसीलजवळील शासकीय विश्रामगृहात करण्यात आले आहे. 
 २ जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाने सामन्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र अ.श.का. १९१८/प्रक ५०७/१६-अ संदर्भ क्र ४ नुसार निश्चित करण्यात आलेले वय ४६ वर्ष हि वयमर्यादा शिथिल करून ५५ वर्ष इतकी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच बरोबर पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना कंत्राटी तत्वावर शासन सेवेत समायोजन करण्यात यावे त्यासाठी शासनबाह्य कंपनी किंवा एनजीओ, प.अं.क. बहुउद्देशीय संस्थेमार्फत नोकरी देण्यात येऊ नये व डीएड, बीएड, बीपीएड च्या कौशल्य विभागाच्या रिक्त जागेवर शासकीय यंत्रणेद्वारेच पदभरती करण्यात यावे यासाठी अमरावती येथे विदर्भस्तरीय मेळाव्याचे आयोजन केले आहे. याच मेळाव्यात पदवीधर अंशकालीन कर्मचारी बाबतच्या महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती म्हणून बडनेऱ्याचे आमदार रवि राणा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. याच मेळाव्यात पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांचा कंत्राटी तत्वावर नोकरीचा अध्यादेश (जीआर) पारित करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालय, मुंबई येथे जाण्याची दिशा ठरविण्यात येईल. त्यामुळे विदर्भातील ११ हि जिल्ह्यातील सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन पदविधर अंशकालीन संघटनेचे अध्यक्ष अनिल वरघट यांच्यासह आशिष पांडे, जयंत नांदुरकर, योगेश जांभूळकर, सतीश डोंगरे, गीता पटले, ज्योती माहुरे, मीना देहनीकर, सुरेखा ठाकरे, भारती फुटाणे, सुरेश ठेंगाळे, विलास सोनोने, ललिता वाकोडे, अनिता वानखडे, रंजना वासनिक, बनारसे ताई, माया सहारे, संजय काकडे, प्रिया भगत, राजश्री मानेकर, रजनी लाहबर, गजानन सुरोसे, रवी मोतीखाये, प्रवीण अटाळकर, अर्चना पाटील, प्रकाश सोनोने, संदीप चरपे, ज्योती खेसे ,सुदाम तरास, सुनिता फुले,  आखरे आदींनी केले आहे.