ढोकीच्या फौजदारने वाचवले डाँक्टरच्या वडिलांचे प्राण

0
1619
Google search engine
Google search engine

ढोकीच्या फौजदारने वाचवले डाँक्टरच्या वडिलांचे प्राण

हुकमत मुलाणी / उस्मानाबाद

उस्मानाबाद – उस्मानाबाद तालुक्यातील कोलेगाव येथे मोटारसाकल व बसच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या डाँक्टरच्या वडिलांना दवाखान्यात ढोकिच्या फौजदारने दाखल केल्यामुळे प्राण वाचले.
कळंब तालुक्यातील शिराढोण येथून प्रकाश हरीश्चंद्र यादव वय ६० वर्षे हे मोटारसाकलवर कोलेगाव मार्गे उस्मानाबादला जात होते . दरम्यान कोलेगाव शिवारात बसने त्यांच्या मोटारसाकलला जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले त्यांचा रक्तश्राव मोठ्या प्रमाणात होत होता.रसत्यावरून ये जा करणार्या वाहनधारकांनी १०८ अँब्युलंन्सला काँल केला परंतू अँब्यूंलसला उशीर होत आसल्यामुळे उपस्थीत नागरीकांनी ढोकी पोलिसांना माहीती दिली.दरम्यान ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणपत जाधव हे पोलिस कर्मचार्यांना घेऊन थेट तात्काळ घटनास्थळी पोहचले व जखमी आवस्थेतील पडलेल्या प्रकाश यादव यांना फौजदार गणपत जाधव यांनी तात्काळ त्यांच्या पोलिस गाडित टाकून त्यांना उस्मानाबाद येथील सुविधा हाँस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.हि घटना ता ५/१/२०१९ (शनिवारी) सकाळी ११-३० वाजण्याच्या सुमारास घडली. यादव यांचा मुलगाही डाँक्टर आहे. त्यामुळे डाँ यादव यांनी ढोकिच्या पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक जाधव यांचे आभार मानले व सोबत पोलिस कर्मचारी चिलवंत व बनसोडे यांचेही आभार व्यक्त केले . ढोकी पोलिस ठाण्याचा जाधव यांनी चार्ज घेतल्यापासून बर्याच घटना व होणारे अनर्थ टळले आहेत. नुकतीच एक घटना ढोकि येथील बस स्थानक प्रवाशी निवारा शेडावरून राजकिय पुढार्यांची तुंबळ हाणामारी झाली होती . त्यावेळीही फौजदार गणपत जाधव यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पोलिस बळाचा वापर करून सौम्य लाठीमार करून परस्थीती अटोक्यात आणली होती .जर सौम्य लाठिमार केला नसता तर आनुचीत प्रकार घडला आसता व एक दोन बळी पडले असते. त्यामुळे सध्या ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांबाबात व त्यांच्या कामाबाबत समाधान व्यक केले जात आहे.