निपाणीजवळ भीषण अपघात; मुरगुडातील एकाच कुटुंबातील सहाजण ठार

0
1092
Google search engine
Google search engine

निपाणी : –

पुणे-बेंगळरू राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटातील अमर हॉटेल समोर कार आणि ट्रकच्या अपघाता सहा जण जागीच ठार झाले. हा अपघात साडे चार वाजता घडला. अपघातातील मृत मुरगूड येथील असून त्यांची ओळख पटवण्याची काम सुरू आहे. सहा ठार, चार पुरुष, एक महिला आणि बालक ठार आहे. पोलिसांना प्राथमिक माहिती मिळाली असून ठार झालेल्यांमध्ये मुरगुडच्या जमादार कुटुंबियांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात कारचा चक्‍काचूर झाला आहे.