आरोग्य संवर्धनाच्या जनजागरासाठी आकोटात उद्या दि.६ जाने.ला वाक् ए थाॕन स्पर्धा

0
781
Google search engine
Google search engine

आज आरोग्य संवर्धनासाठी धावणार आकोट……

आकोट/प्रतीनीधी

वाॕर फाऊंडेशन आकोट व डाॕ विनित हिंगणकर यांच्या ओझोन मल्टीस्पेशालिटी हाॕस्पीटल अकोला यांचे संयुक्त विद्यमाने उद्या ६ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ६-३०वाजता श्री शिवाजी महाविद्यालय आकोट चे प्रांगणात आरोग्यासाठी धावा
या वाक् ए थाँन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमात विविध वयोगटानुसार बालक,युवक युवतीसह आकोट नगरवासी ,जेष्ठ नागरिक महिला पुरुष ,धावपटू.सहभागी होत आहेत.

सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी ,मान्यवर पुढा-यांसह
विविध संस्था,स्वयंसेवी व सामाजिक संस्थ,व्यायाम मंडळे,शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक,डाॕक्टर्स वकील मंडळी देखील सहभागी होत आहेत

आकोट शहरातील सामाजिक सद् भाव वृद्धींगत व्हावा या हेतूने आयोजित एकता दौड मध्ये सहकुटूंब मित्र परिवारासह अनेक स्पर्धक सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेत सामाजिक एकतेचा संदेश देणारी वेशभूषा, पोस्टर्स स्पर्धासह विविध उपक्रम संपन्न होणार आहेत.

वाॕर फाऊंडेशन आकोट ह्या विधायक कार्य करणा-या महिला युवतींच्या संस्थेद्वारा गत तीन वर्षापासून ओरोग्य संवर्धनासाठी वाक् ए थाॕन उपक्रम राबविला जात आहे.या उपक्रमास आकोट नगरवासियांनी भरभरुन सहकार्य केले आहे

विद्यार्थी शिक्षक ,युवक युवती तथा मंडळ,स्वयंसेवी व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी ,सदस्य व कार्यकर्त्यांसह नागरिकांनी उत्कृष्ट सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

स्पर्धे करीता संयोजकांकडे सहभागाची नोंदणी करुन संपर्क साधावा असे आयोजकांनी कळवले आहे.