युवा सेना उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे यांना युवा सेनेच्या राज्य विस्तारक पदावर बढती

0
896
Google search engine
Google search engine

आकोट उपविभागासह जिल्ह्यातील युवा सैनिकांमध्ये आनंद

अकोट/संतोष विणके

शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी अकोट.थेथील राहुल रामेश्वर कराळे यांची थेट युवा सेनेच्या राज्य विस्तारक पदी नियुक्ती केली आहे.

युवा सेनेच्या राज्य कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये आदीत्य ठाकरे यांनी मोजक्याच विश्वासपात्र युवकांचा समावेश करण्यात आला. विस्तारकाना किमान दोन जिल्ह्यात संघटन वाढविण्याची जबाबदारी दिली जाते.याध्ये अकोला युवासेना उपजिल्हा प्रमुख राहुल कराळे यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. राहुल कराळे हे माजी आमदार, स्व. रामाभाऊ कराळे यांचे सुपुत्र आहेत

, या नियुक्तीचे श्रेय युवासेना सचिव वरूण सरदेसाई,शिवसेना सचिव सुरज चव्हाण, नामदार दिवाकर रावते , अकोला जिल्हा संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत, विधान परिषद आमदार गाेपीकीशन बाजाेरीया,आमदार विपल्व बाजाेरीया,माजी आमदार संजय गावंडे, आकाेला शिवसेना सह सम्पर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर, जिल्हाप्रमुख नितिन देशमुख, आणि जिल्ह्यातील सर्व शिवसेना युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी व युवसानिकांना देत आहे, जिल्ह्यातील युवासेना बळकटीकरण,युवासेनेचा विस्तार यामध्ये राहुल कराळे यांनी महत्त्वाची भुमिका बजावली आहे.त्यांच्या या यशासाठी आकाेट मतदारसंघातील आणि अकोला जिल्ह्यातील पदाधिकारीव शिवसैनिकांनी फटाके फोडुन सवागत केले.