अनुसूचित जातीच्या बचत गटांना मिळणार 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर

0
687
Google search engine
Google search engine

अनुसूचित जातीच्या स्वयंसहायता बचतगटांना मिळणार

90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने

उस्मानाबाद,दि.7:- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 6 डिसेंबर 2012 च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीवेटर किंवा रोटावेटर ट्रेलर्स इत्यादी साहित्य पुरवठा करण्याच्या योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी तपासणी करण्यात आली असून तपासणीअंती कागदोपत्री त्रुटी असलेल्या बचतगटांची यादी कार्यालयाच्या दर्शनी भागावर चिकटविण्यात आलेले आहेत.

ज्या बचतगटांनी सहाय्यक आयुक्त कार्यालयात मिनी ट्रॅक्टर योजनेचे प्रस्ताव सादर केले होते त्यांनी यादीचे अवलोकन करुन दि. 10 जानेवारी 2019 पर्यंत त्रुटींची पूर्तता करावी, दि. 10 जानेवारी नंतर कागदपत्रे स्वीकारले जाणार नाहीत, याची सर्वांनी नोंद घ्यावी,असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.