पत्रकार दिना निमित्य आरोग्य तपासणी शिबिर

94

आकोट तालुका पत्रकार संघ व बाबु जगजीवनराम संस्थेचा उपक्रम

आकोट/ प्रतीनिधी

पत्रकार हा समाजातील महत्वाचा घटक आहे. पत्रकारीता क्षेत्रात कार्य करतांना पत्रकारांनी स्वत:चे आरोग्य जपावे. धकाधकीच्या बदलत्या जीवनशैलीमुळे सध्याच्या काळात रोगाला प्रतिबंध हाच महत्वाचा उपाय आहे. कारण आपले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनी सुध्दा आरोग्याबाबत सजग रहावे. वेळोवेळी आवश्यक तपासण्या कराव्यात, जेणेकरुन रोग उत्पन्न होण्यापुर्वीच त्याचा प्रतिबंध होऊ शकेल. असे मार्गदर्शन बाबु जगजीवनराम शिक्षण संकुलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.कैलास जपसरे यांनी केले.

पत्रकार दिनाचे औचित्य साधुन आकोट तालुका पञकार संघ व बाबु जगजिवनराम संस्था यांच्या सयुक्त विद्यमाने स्थानिक जपसरे हॉस्पिटल अ‍ॅन्ड क्रिटीकल केअर येथे रविवार 6 जानेवारी रोजी पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. त्यावेळी डॉ.जपसरे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दीपक देव हे होते. मंचावर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिआेम व्यास, सचिव मंगेश लोणकर, रामदास काळे, संजय आठवले यांची उपस्थिती होती.

यावेळी सचिव मंगेश लोणकर,संजय आठवले,रामदास काळे व दिपक देव यांनी पत्रकारीतेची भविष्यातील वाटचाल व आव्हानांबाबत आपले विचार व्यक्त केलेत.प्रास्ताविक निलेश पोटे तर संचालन पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष कमलकिशोर भगत यांनी केले. शिबीरात पत्रकारांची रक्तदाब, रक्त शर्करा तपासणी करण्यात आली. डॉ.जपसरे यांनी आवश्यक वैद्यकिय सल्ला दिला. तत्पुर्वी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित पत्रकारांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाला पत्रकार विजय शिंदे, बाप्पु नागळे, रमेश तेलगोटे, वामन जकाते, किरण भडंग, बाळासाहेब इंगळे, राहुल कुलट, संतोष विणके, सारंग कराळे, लकी इंगळे, सैय्यद अहमद, दिनकर सोनोने, विनोद राठोड, स्वप्निल सरकटे, दीपक रेळे, विनोद कोनप्ते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाकरिता योगेश मगरे, इम्रान, अवेस मिर्झा, प्रदीप तेलगोटे, विनोद राऊत, अमर जपसरे आदींनी परिश्रम घेतले.

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।