डॉ.दीपक सावंत यांचा मंत्रीपदाचा राजीनामा

0
650
Google search engine
Google search engine

एकनाथ शिंदे यांच्याकडे आरोग्यमंत्रीपदाची अतिरिक् जबाबदारी

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सोपवला आहे. डॉ. सावंत हे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झाले होते, त्यावेळी ते विधानपरिषदेचे सदस्य होते. मात्र आमदारकीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून ते विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे नियमाप्रमाणे त्यांनी सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.आरोग्यमंत्रीपदाचा अतिरिक्‍त कार्यभार सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दीपक सावंत हे मुंबई पदवीधर मतदारसंघातुन यापूर्वी विधानपरिषदेवर निवडून आले होते. मात्र सावंत यांना दुस-यांना उमेदवारी नाकारण्यात आली. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत विलास पोतनीस यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. या निवडणुकीत पोतनीस हे मोठ्या फरकाने निवडून आले.
निवडणुकीतून पत्ता कापण्यात आल्यामुळे डॉ. सावंत यांनी गेल्या वर्षी 4 जून रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवले होते.

दीपक सावंत यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत 7 जुलै रोजी संपली आहे. त्यानंतर सहा महिन्यांत त्यांना पुन्हा विधानसभा किंवा विधानपरिषद सदस्य म्हणून निवडून येणं आवश्‍यक होते, नियमांनुसार सहा महिने कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना मंत्रीपदावर राहता येत. मात्र, या सहा महिन्यात कुठल्याही सभागृहाचे सदस्य न झाल्यास मंत्रीपद संपुष्टात येते. त्यानुसार डॉ. सावंत यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आरोग्यमंत्रीपदाचा कार्यभार आता एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.ही तात्पुरती सोय राहणार की शिवसेनेच्या दुस-या कोणाला मंत्रीपद देण्यात येणार हे आता पहावे लागणार आहे.